दगडूशेठ मंदिर परिसरात ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून ८३ हजारांचा ऐवज चोरीला

Date:

गर्दीचा फायदा घेत रोकड आणि सोन्याची साखळी लंपास; मांजरीत महिलेचे १.२० लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्शनासाठी आलेल्या एका ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून रोकड आणि सोन्याची साखळी असा ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील इंदूर येथील ६३ वर्षीय महिला दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिर परिसरात मोठी गर्दी असताना चोरट्यांनी त्याचा फायदा घेत त्यांच्या पिशवीतून तीन हजार रुपयांची रोकड आणि सोन्याची साखळी, असा एकूण ८३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

घटना लक्षात आल्यानंतर महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस हवालदार एस. गोंजारी पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग आणि रविवार पेठ परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पिशव्यांमधून दागिने आणि रोकड चोरीला जाण्याच्या घटना अलीकडे समोर आल्या आहेत.

मांजरीत महिलेचे १.२० लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

दुसऱ्या घटनेत, हडपसरमधील मांजरी परिसरात पायी जाणाऱ्या ५२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले.

ही घटना २७ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास मांजरीतील झेड कॉर्नर परिसरात घडली. महिला पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आणि तेथून पसार झाले.

याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचारी प्रदीप सोनवणे पुढील तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी;

२०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास पुणे: शहरातील...

राखीच्या धाग्यातून उमटली कृतज्ञतेची भावना

ना. चंद्रकांतदादा पाटील यांना वस्ती भागातील असंख्य मातांनी बांधली...

दुसऱ्याच्या दुःखात मदतीसाठी प्रत्येकाच्या घरात एखादी पिगी बँक असावी : ना. चंद्रकांतदादा पाटील

चंद्रकांतदादा पाटील यांच्या कामाने प्रभावित : कृष्णकुमार बूब मानसी प्रेरणा...