भाजप प्रदेश कार्यकारिणीची सोमवारी पुण्यात बैठक

Date:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती; प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक सोमवारी (दि. ३१) पुण्यात होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे हेही बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. प्रदेश चिटणीस वर्षा डहाळे, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, दीपक पोटे, विश्वास ननावरे पदाधिकारी योगेश बाचल,अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर यांची उपस्थिती होती.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात सकाळी नऊ वाजता बैठकीला सुरुवात होईल. चव्हाण यांनी भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच प्रदेश कार्यकारिणी बैठक आहे.

या बैठकीला पक्षाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य, राष्ट्रीय व राज्य परिषद सदस्य, जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा प्रभारी, विविध मोर्चांचे प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, माजी खासदार व माजी आमदार यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीसह विविध विषयांवर चर्चा होणार आहे. राजकीय आणि सामाजिक विषयांवरील ठराव या बैठकीत मांडण्यात येणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यास मान्यता

पुणे महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन पुणे :...

पुणे विमानतळाचेजुने टर्मिनल नव्या स्वरूपात लवकरच पुणेकरांच्या सेवेत : मुरलीधर मोहोळ

जुन्या टर्मिनलला एकच परवानगी बाकी पुणे (प्रतिनिधी) : पुणे विमानतळाच्या...

कात्रज कोंढवा रस्त्यावरील शाळकरी मुलीच्या अपघाती मृत्यूने विरोधक संतप्त

पुणे- कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू...

कात्रज-कोंढवा रस्ता आणखी किती बळी घेणार ; मुख्यसभेत विरोधी पक्षनेते निलेश निकम आक्रमक

वारंवार होणाऱ्या अपघातांवरून प्रशासनाला जाब; रस्त्याचे रखडलेले काम आणि...