बालवडकरांपाठोपाठ सुहास टिंगरेंचाही वार्ड स्तरीय निधी केला शून्य

Date:

“हा सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा नाही, जनतेच्या टॅक्सचा पैसा”; सुहास टिंगरे यांचा हल्लाबोल
पुणे, दि. २० : पुणे महापालिकेतील निधीवाटपावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य सुहास टिंगरे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक २ ड मधील सुमारे १२ कोटी रुपयांचा विकासनिधी प्रभाग क्रमांक ३ मध्ये वर्गीकरण करून वळविण्यात आला आहे. “हा पैसा सत्ताधाऱ्यांचा किंवा विरोधकांचा नसून जनतेने भरलेल्या टॅक्सचा पैसा आहे,” अशी भूमिका टिंगरे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.टिंगरे यांच्या प्रभागात नसलेले, अन्य प्रभागातून निवडून आलेले भाजपा नगसेवक संदीप बेलदरे आणि दादा कोद्रे यांनी टिंग रे यांच्या निधी कपातीचा .वर्गीकरणाचा प्रस्ताव दिला जो आज स्थायीच्या बैठकीत संमत झाला.
महापालिकेतील निधीवाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हमरी तुमरी सुरू आहे.राज्यात एकत्रित सत्तेत असताना महापालिकेत विरोधात असलेले हे दोन्ही पक्ष आता आपसात खेचाखेची करत आहेत.भाजपा नेत्यांवर टीका केल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादीतून निवडून आलेले बालवडकर यांच्या निधीत कपात केल्यावर आता टिंगरे यांच्या प्रभागातील निधीचा मुद्दाही पुढे आला आहे.


टिंगरे यांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग क्रमांक २ ड मधील विकासकामांसाठी असलेला सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे प्रभाग क्रमांक ३ मध्ये वळविण्यात आला. आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी असलेला विकासनिधी दुसऱ्या प्रभागात वळविण्याच्या निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला.
“महापालिकेचा पैसा हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. तो पुणेकर नागरिकांनी भरलेल्या करातून जमा झालेला पैसा आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक असा भेद करून विकासनिधीकडे पाहणे योग्य नाही,” अशी भूमिका टिंगरे यांनी मांडली.
बालवडकर-टिंगरेंच्या प्रस्तावाची पार्श्वभूमी
या निधीवाटपाच्या वादाला कोथरूडमधील विकासकामांच्या चौकशीच्या प्रस्तावाचीही पार्श्वभूमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघात आमदार निधी तसेच अन्य निधीतून झालेल्या काही विकासकामांचे विशेष लेखापरीक्षण आणि आवश्यकतेनुसार थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट करण्याची मागणी करणारा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मांडला होता.
या प्रस्तावानंतर महापालिकेतील राजकीय वातावरण तापले. त्यानंतर बालवडकर यांच्या विकासनिधीचा मुद्दा सर्वसाधारण सभेत आला आणि आता टिंगरे यांच्या प्रभागातील निधीही दुसऱ्या प्रभागात वळविल्याचा दावा समोर आला आहे.

बिडकरांच्या पत्रामुळे वादाला नवे वळण
दरम्यान, भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या भूमिकेबाबत तक्रार केली आहे. बालवडकर आणि टिंगरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर टीका केल्याचा आक्षेप या पत्रातून घेण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
यामुळे महापालिकेतील निधीवाटपाचा विषय आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे.
प्रभाग क्रमांक २ ड मधील सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी नेमका कोणत्या कामांसाठी मंजूर होता, तो प्रभाग क्रमांक ३ मधील कोणत्या कामांकडे वर्ग करण्यात आला आणि प्रभाग २ ड मधील नियोजित विकासकामांसाठी आता निधी कसा उपलब्ध करून दिला जाणार, याबाबत महापालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
“विकासकामांसाठी असलेला पैसा कोणत्याही पक्षाचा नसून जनतेच्या करातून आलेला आहे,” या टिंगरे यांच्या भूमिकेमुळे पुणे महापालिकेतील भाजप-राष्ट्रवादी निधीवाटपाचा वाद रंगत चालला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे ग्रँड टूरसाठी १३६ किमी रस्त्यांची तपासणी:रस्ते, पदपथांच्या दर्जासाठी ‘पेव्हटेक’ची सल्लागार म्हणून नियुक्ती

कामांच्या खर्चाच्या १.५ टक्के शुल्क पुणे- जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या...

खड्डे बुजविण्यापासून स्वच्छतागृहांच्या देखभालीपर्यंत; महापालिका प्रशासनाला भिमाले यांचे निर्देश

आठवडाभरात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश; गणेशोत्सवापूर्वी बंद स्वच्छतागृहे सुरू...