रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित- अर्चना गायकवाड

Date:

पुणे, दि.11 : प्रादेशिक प्राधिकरण, पुणे, पिंपरी- चिंचवड व बारामती कार्यक्षेत्रामधील रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर लागू करण्यात आले असून हे भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी लागू राहतील, रुग्णवाहिकांकरिता निश्चित केलेल्या दरपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या वाहन चालक, मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.

सुधारित दरपत्रकानुसार अवातानुकुलीत मारुती व्हॅन साठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 700 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 16 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 125 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 4 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 1 हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत मारुती ईको, टाटा मॅजिक यासाठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 900 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 17 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 125 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 4 हजार 500 रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 1 हजार 200 रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत महिंद्रा बोलेरो, फोर्स क्रुझरसाठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 1 हजार 200 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 18 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 150 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 5 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 1 हजार 500 रुपये प्रतिदिन दर राहतील.

अवातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 1 हजार 500 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 22 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 175 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 7 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 2 हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

वातानुकुलीत फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी (आयसीयु) 25 कि.मी. अथवा दोन तासासाठी 2 हजार 500 रुपये, त्यापुढील प्रती किलोमीटर साठी 30 रुपये, प्रति प्रतिक्षा तास 250 रुपये, प्रतिदिन किंवा 300 कि.मी. साठी 10 हजार रुपये, इंधन, देखभाल व दुरुस्ती व चालकांशिवाय 4 हजार रुपये प्रतिदिन दर राहतील.

निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा जास्त भाडेदर आकारणी करणाऱ्या वाहनमालक, चालकांवर दंडात्मक कारवाई म्हणून पहिल्या गुन्ह्याकरिता 5 हजार रुपये दुसऱ्या गुन्ह्याकरिता 10 हजार रुपये व तिसऱ्या व त्यापुढील प्रत्येक गुन्ह्याकरिता 20 हजार रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही श्रीमती गायकवाड यांनी कळविले आहे.
00000

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ब्रिटनच्या धर्मगुरूसह आयोजकांवर खडक पोलिसांत धर्मस्वातंत्र्य अधिनियमांतर्गत पुण्यात पहिलाच गुन्हा

गुरुवार पेठेतील पंच हौद येथील कार्यक्रमावर कारवाई:प्रवचनातून अंधश्रद्धेला खतपाणी...

अ‍ॅमेझॉननंतर ब्लिंकिटवर FDAची धडक कारवाई; मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित

गोदामात झुरळांचा सुळसुळाट, मुदतबाह्य अन्नसाठा; दुसरीकडे दूध भेसळ रॅकेटचा...

गायीचे दूध 62, तर म्हशीचे 78 रुपये लिटर; दही-पनीर-तुपाच्या दरवाढीचीही शक्यता

11 ऑगस्टपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ; वाढत्या...