ब्रिटनच्या धर्मगुरूसह आयोजकांवर खडक पोलिसांत धर्मस्वातंत्र्य अधिनियमांतर्गत पुण्यात पहिलाच गुन्हा

Date:

गुरुवार पेठेतील पंच हौद येथील कार्यक्रमावर कारवाई:प्रवचनातून अंधश्रद्धेला खतपाणी घालून धर्मांतरासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

पुणे : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 लागू झाल्यानंतर या कायद्यांतर्गत राज्यातील पहिलाच गुन्हा पुणे शहरातील खडक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. गुरुवार पेठेतील पंच हौद परिसरातील एका प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत आणि नागरिकांच्या धार्मिक भावना व श्रद्धांमध्ये संभ्रम निर्माण करत धर्मांतरासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ब्रिटनमधील एका धर्मगुरूसह कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी पंकज जेम देवनूर (वय 50, रा. मँचेस्टर, ब्रिटन) यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमित राजू भोसले (वय 31, रा. रामोशी गेट, भवानी पेठ) यांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

7 ते 9 ऑगस्टदरम्यान धार्मिक कार्यक्रम

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठेतील संबंधित प्रार्थनास्थळाच्या वर्धापनदिनानिमित्त 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ब्रिटनहून धर्मगुरू पंकज देवनूर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, या कार्यक्रमातील प्रवचनादरम्यान “येशूचे नाव घेतल्याने पाऊस पडतो” तसेच “सर्व आजार बरे होतात” अशा प्रकारची वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप आहे. या वक्तव्यांमधून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यात आले तसेच हिंदू देवदेवतांविषयी उपस्थित नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

धर्मांतरासाठी आकर्षित करण्याचा आरोप

तक्रारीनुसार, धार्मिक प्रवचनाच्या माध्यमातून उपस्थितांना प्रभावित करून धर्मांतरासाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आरोपांची दखल घेत खडक पोलिसांनी संबंधित धर्मगुरू आणि आयोजकांविरुद्ध महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 तसेच परदेशी नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

राज्यात हा नवीन कायदा लागू झाल्यानंतर त्याअंतर्गत नोंदविण्यात आलेला हा पहिलाच गुन्हा असल्याने या प्रकरणाकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.

व्हिडिओ व पुरावे तपासात

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिता तोंडे करत आहेत. पोलिसांकडून कार्यक्रमातील भाषणांचे व्हिडिओ, आयोजकांची भूमिका, कार्यक्रमाचे स्वरूप तसेच कथित धर्मांतराच्या प्रयत्नांबाबत अधिक पुरावे गोळा केले जात आहेत.

या प्रकरणामुळे धार्मिक कार्यक्रम, अंधश्रद्धा आणि धर्मांतरासंबंधीच्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत राज्यभरात चर्चेला सुरुवात झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रुग्णवाहिकांचे सुधारित भाडेदर निश्चित- अर्चना गायकवाड

पुणे, दि.11 : प्रादेशिक प्राधिकरण, पुणे, पिंपरी- चिंचवड...

अ‍ॅमेझॉननंतर ब्लिंकिटवर FDAची धडक कारवाई; मालाडमधील गोदामाचा अन्न परवाना निलंबित

गोदामात झुरळांचा सुळसुळाट, मुदतबाह्य अन्नसाठा; दुसरीकडे दूध भेसळ रॅकेटचा...

गायीचे दूध 62, तर म्हशीचे 78 रुपये लिटर; दही-पनीर-तुपाच्या दरवाढीचीही शक्यता

11 ऑगस्टपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ; वाढत्या...