विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ६५ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण

Date:

पुणे, दि. १० : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ९६ टक्के अर्जांचे वितरण पूर्ण झाले असून ६५.५३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या साप्ताहिक बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी तहसीलदार शीतल मुळे यांच्यासह नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.

अनुपस्थित, स्थलांतरित, मयत व दुबार मतदारांच्या याद्या संकेतस्थळावर
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर म्हणाल्या, अनुपस्थित, स्थलांतरित, मयत तसेच दुबार मतदारांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी या याद्यांचे अवलोकन करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच नमुना क्रमांक ६, ७ व ८ मधील अर्जांचे अवलोकन करून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी त्याचा उपयोग करावा.
मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य महत्त्वाचे असून प्राप्त होणारे दावे व हरकती विहित मुदतीत निकाली काढण्यासाठी प्राधान्याने नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणीसाठी सहकार्याचे आवाहन
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदवीधर व शिक्षक मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या प्रक्रियेत शिक्षक व पदवीधर मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी होण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहनही श्रीमती कळसकर यांनी केले.
बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसंदर्भात अडचणी व सूचना मांडल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी संबंधित अडचणींचे निरसन केले.
००००

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बालेवाडीत १.१ दशलक्ष चौ.फुटांचा ‘ग्रेड ए’ कमर्शियल टॉवर; डीबीएस बँकेकडून के रहेजा कॉर्पला ५२० कोटींचे वित्तसाहाय्य

‘LEED Platinum’ पूर्व-प्रमाणित प्रकल्पासाठी निधी; बालेवाडी बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये फ्युचर-रेडी...

‘महापौर बंगला, महापौर बंगलाच राहू द्या’; नाव बदलण्यास पुणे शहर माजी महापौर संघटनेचा विरोध

‘रामदूत’ नामकरणाच्या प्रस्तावावर माजी महापौरांची नाराजी; महापौर निवासाची जुनी...