‘महापौर बंगला, महापौर बंगलाच राहू द्या’; नाव बदलण्यास पुणे शहर माजी महापौर संघटनेचा विरोध

Date:

‘रामदूत’ नामकरणाच्या प्रस्तावावर माजी महापौरांची नाराजी; महापौर निवासाची जुनी ओळख कायम ठेवण्याची मागणी

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या घोले रोड येथील महापौर निवासस्थानाचे नाव बदलू नये आणि ‘महापौर निवास’ हीच त्याची ऐतिहासिक व प्रशासकीय ओळख कायम ठेवावी, अशी ठाम भूमिका पुणे शहर माजी महापौर संघटनेने घेतली आहे. महापौर बंगल्याला ‘रामदूत असे नाव देण्याचा प्रस्ताव पुढे आल्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेने विद्यमान महापौरांना पत्र देत या नामांतरास विरोध दर्शविला आहे.

“महापौर बंगला हा महापौरांसाठीच उभारण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याची ‘महापौर निवास’ ही ओळख बदलण्याचे कारण नाही,” अशी भूमिका माजी महापौरांनी मांडली आहे.

पुणे शहराच्या महापौरांना त्यांच्या कामकाजाच्या सोयीसाठी शहरात अधिकृत निवासस्थान असावे, या उद्देशाने पुणे महापालिकेने घोले रोड परिसरात हे दुमजली निवासस्थान उभारले. संघटनेच्या पत्रानुसार, २००२ मध्ये तत्कालीन महापौर दीप्ती चौधरी यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याला ‘महापौर निवास’ असे नाव देण्यात आले. तेव्हापासून ही वास्तू याच नावाने पुणेकरांमध्ये परिचित आहे.

‘रामदूत’ नावाच्या प्रस्तावाला विरोध

२०२६ मध्ये निवडून आलेल्या एका सदस्याकडून या बंगल्याला ‘रामदूत ’ असे नाव देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे संघटनेने पत्रात नमूद केले आहे. हा प्रस्ताव माजी महापौर संघटनेच्या बैठकीत चर्चेला आल्यानंतर त्यास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापौर हे पुणे शहराचे प्रथम नागरिक असून त्यांच्या अधिकृत निवासस्थानाला असलेली ‘महापौर निवास’ ही ओळख व्यक्ती किंवा राजकीय कालखंडानुसार बदलू नये, अशी माजी महापौरांची भूमिका आहे.

मुंबईच्या महापौर निवासाचाही दाखला

संघटनेने आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ मुंबईचाही दाखला दिला आहे. मुंबईसारख्या महानगरात महापालिकेने महापौरांसाठी उभारलेले निवासस्थानही ‘महापौर निवास’ याच नावाने परिचित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे पुण्यातील महापौर निवासाचे नाव बदलून नवीन नामकरण करण्याची आवश्यकता नसून, वर्षानुवर्षे प्रचलित असलेले ‘महापौर निवास’ हेच नाव कायम ठेवावे, अशी विनंती संघटनेने महापौरांकडे केली आहे.

अनेक माजी महापौर एकवटले

या मागणीसाठी माजी महापौर संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे, अंकुश काकडे, तसेच माजी महापौर वंदना चव्हाण, मुरलीधर मोहोळ, विठ्ठल लडकत, बाळासाहेब शिवरकर, सुरेश शेवाळे, दत्तात्रय गायकवाड, दीप्ती चौधरी, वैशाली बनकर, दत्तात्रय धनकवडे आणि प्रशांत जगताप यांची नावे पत्रावर आहेत.

महापौर निवास ही केवळ वास्तू नसून पुणे शहराच्या महापौरपदाची आणि महापालिकेच्या परंपरेची ओळख आहे, त्यामुळे तिचे नामांतर करू नये, असा सूर माजी महापौरांनी लावला आहे.

आता या मागणीवर विद्यमान महापौर आणि पुणे महापालिका प्रशासन काय निर्णय घेते, तसेच ‘रामदूत’ नामकरणाचा प्रस्ताव पुढे नेला जातो की ‘महापौर निवास’ हेच नाव कायम ठेवले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बालेवाडीत १.१ दशलक्ष चौ.फुटांचा ‘ग्रेड ए’ कमर्शियल टॉवर; डीबीएस बँकेकडून के रहेजा कॉर्पला ५२० कोटींचे वित्तसाहाय्य

‘LEED Platinum’ पूर्व-प्रमाणित प्रकल्पासाठी निधी; बालेवाडी बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये फ्युचर-रेडी...

पुण्यात ‘घर घर भक्तांमर, हर घर भक्तांमर’चा संकल्प

चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सवात आचार्य 108 श्री डॉ....

खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्याचे आयुक्तांचे आदेश

नॉर्थ मेन रोडचे रुंदीकरण, हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची कामेही...