स्वच्छता सप्ताहात कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय अव्वल; शिवाजीनगर-घोले रोड दुसरे, नगररोड-वाघोली तिसरे

Date:

१५ हजार ७२६ पुणेकरांचा सहभाग; ६३.१ टन ओला, ८६.७ टन सुका आणि २४७.३ टन राडारोडा कचरा संकलित

पुणे : लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांत राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छता सप्ताहा’त कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. छत्रपती शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालय द्वितीय, तर नगररोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालय तृतीय क्रमांकावर राहिले. वारजे-कर्वेनगर आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांना विशेष कामगिरीबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

महापौर मंजुषाताई नागपुरे आणि महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार २२ ते २८ जुलैदरम्यान स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला होता. त्यानंतरही ५ ऑगस्टपर्यंत विविध स्वच्छता उपक्रम सुरू ठेवण्यात आले. या कालावधीत क्षेत्रीय कार्यालयांच्या कामगिरीचे स्वतंत्र संस्थेमार्फत परीक्षण करण्यात आले आणि त्याआधारे विजेत्यांची निवड करण्यात आली.

रस्त्यांपासून नदी-नाल्यांपर्यंत ‘डीप क्लीन’

स्वच्छता सप्ताहामध्ये शहरातील सार्वजनिक रस्ते, वाहतूक केंद्रे, बस व रेल्वे स्थानके, रिक्षा स्टँड, विमानतळ परिसर, शाळा, मंडई, बाजारपेठा, व्यावसायिक भाग, सरकारी इमारती, आरोग्य कोठ्या, झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमध्ये विशेष डीप क्लीनिंग ड्राइव्ह राबविण्यात आले.

नदी, नाले, तलावांसह जलस्रोतांची स्वच्छता, ई-कचरा, प्लास्टिक कचरा, फर्निचर, गाद्या आणि अन्य निरुपयोगी वस्तूंचे संकलन, घरातील अडगळ काढण्याचे अभियान, देव-देवतांच्या जुन्या फोटोचे संकलन तसेच सार्वजनिक व वस्त्यांतील शौचालयांच्या स्वच्छतेसाठीही विशेष मोहीम राबविण्यात आली.

१५,७२६ नागरिक सहभागी; शेकडो टन कचरा संकलित

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार या स्वच्छता सप्ताहात १५ हजार ७२६ नागरिकांनी सहभाग नोंदविला. क्षेत्रीय कार्यालयांनी राबविलेल्या मोहिमेत ६३.१ मेट्रिक टन ओला कचरा, ८६.७ मेट्रिक टन सुका कचरा आणि तब्बल २४७.३ मेट्रिक टन राडारोडा संकलित करण्यात आला.

याशिवाय ४.५ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा आणि ५.२ मेट्रिक टन गाद्या, फोम, कापड आदी अडगळीचे साहित्य जमा करण्यात आले. तसेच ७४३ देव-देवतांचे जुने फोटो संकलित करण्यात आले.

कसबा पेठची कामगिरी सर्वोत्तम

क्षेत्रीय कार्यालयांच्या कामाचे परीक्षण केल्यानंतर कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाला प्रथम, छत्रपती शिवाजीनगर-घोले रोडला द्वितीय, तर नगररोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयाला तृतीय पारितोषिक देण्यात आले.

वारजे-कर्वेनगर आणि हडपसर-मांजरी क्षेत्रीय कार्यालयांना विशेष कामगिरीबद्दल उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. महापौर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या क्षेत्रीय कार्यालयांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सफाई सेवकांना प्रातिनिधिक स्वरूपात PPE किटचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. स्वच्छता सप्ताहात सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी केलेल्या कामाचे कौतुक करत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘महापौर बंगला, महापौर बंगलाच राहू द्या’; नाव बदलण्यास पुणे शहर माजी महापौर संघटनेचा विरोध

‘रामदूत’ नामकरणाच्या प्रस्तावावर माजी महापौरांची नाराजी; महापौर निवासाची जुनी...

पुण्यात ‘घर घर भक्तांमर, हर घर भक्तांमर’चा संकल्प

चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सवात आचार्य 108 श्री डॉ....

खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्याचे आयुक्तांचे आदेश

नॉर्थ मेन रोडचे रुंदीकरण, हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची कामेही...

कंटेनरच्या धडकेने विस्कळीत झालेला भोसरीचा वीजपुरवठा पूर्ववत

महावितरणची युद्धपातळीवर दुरुस्ती;नवीन डबल पोल स्ट्रक्चर उभारून दोन्ही फिडर...