कंटेनरच्या धडकेने विस्कळीत झालेला भोसरीचा वीजपुरवठा पूर्ववत

Date:

महावितरणची युद्धपातळीवर दुरुस्ती;
नवीन डबल पोल स्ट्रक्चर उभारून दोन्ही फिडर ५ वाजता सुरू

पुणे, दि. १० ऑगस्ट २०२६ : भोसरी औद्योगिक वसाहतीत कंटेनरच्या धडकेमुळे विस्कळीत झालेला महावितरणचा वीजपुरवठा युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करून आज दुपारी ५ वाजता पूर्णपणे पूर्ववत करण्यात आला. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून नवीन डबल पोल स्ट्रक्चर उभारले आणि फिडर क्रमांक १२ एफ-२ तसेच १६ जे-२ या दोन्ही फिडरचा वीजपुरवठा सुरळीत केला.

रविवारी (दि. ९ ऑगस्ट) सकाळी ११.४० वाजता टाटा मोटर्स शोरूमच्या मागील बाजूस असलेल्या वळण रस्त्यावर १० टन क्षमतेचा कंटेनर (एमएच १२ एचडी ०२९९) भरधाव वेगात येऊन अनियंत्रित झाला. कंटेनरने महावितरणच्या उच्चदाब वाहिनीच्या डबल पोल स्ट्रक्चरला जोरदार धडक दिल्याने पोल वाकला आणि कंटेनर त्यामध्ये अडकला. पोलवरील कंडक्टर एकमेकांना चिकटल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

या घटनेमुळे फिडर क्रमांक १२ एफ-२ व १६ जे-२ विभागांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. फिडर क्रमांक १६ जे-२ चा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेद्वारे रात्री १२.५७ वाजता सुरू करण्यात आला. मात्र, नुकसानग्रस्त डबल पोल स्ट्रक्चरमध्ये अडकलेला कंटेनर बाजूला करण्यासाठी तीन क्रेनची आवश्यकता होती. रात्री क्रेन उपलब्ध न झाल्याने कंटेनर हलविणे शक्य झाले नाही. सोमवारी सकाळी ८ वाजता क्रेन उपलब्ध झाल्यानंतर सकाळी ११ वाजता कंटेनर बाजूला करण्यात आला.

त्यानंतर महावितरणच्या पथकाने तुटलेले स्ट्रक्चर काढून नवीन डबल पोल स्ट्रक्चर उभारले. आवश्यक दुरुस्ती पूर्ण करून दोन्ही फिडरचा वीजपुरवठा दुपारी ५ वाजता सुरळीत करण्यात आला.

दरम्यान, यशवंतनगर चौक ते टाटा मटेरियल गेटमागील भाग, वंडर कार शोरूम परिसर आणि जय मातादी कॅन्टीन परिसरातील सुमारे ४५ रोहित्रांचा वीजपुरवठा या दुर्घटनेमुळे बाधित झाला होता. तोही आता पूर्ववत करण्यात आला आहे.

भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून महावितरणच्या यंत्रणेला धडक देत वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी संबंधित कंटेनर चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात ‘घर घर भक्तांमर, हर घर भक्तांमर’चा संकल्प

चातुर्मास मंगल कलश स्थापना महोत्सवात आचार्य 108 श्री डॉ....

खराडी-केशवनगर पूल १५ ऑगस्टला वाहतुकीसाठी खुला करण्याचे आयुक्तांचे आदेश

नॉर्थ मेन रोडचे रुंदीकरण, हडपसर रेल्वे स्टेशन रस्त्याची कामेही...

राज्यभर प्रत्येक विभागात लोककलांचा महोत्सव करणार

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा राजर्षी शाहू...