PMPMLची ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवा सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Date:

मुळशी धरण, पळसे धबधबा आणि नयनरम्य सेल्फी पॉईंटचा प्रवास; पुणेकरांना सुरक्षित व किफायतशीर पर्यटनाची संधी

पुणे, दि. ४ ऑगस्ट : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मार्ग क्रमांक ९ (अ) ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवेचे उद्घाटन मंगळवारी स्वारगेट बसस्थानक येथे महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी PMPMLचे संचालक अजय खेडेकर उपस्थित होते.

या विशेष बस सेवेमुळे पुणेकर आणि पर्यटकांना पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा सुरक्षित आणि आरामदायी पद्धतीने आनंद घेता येणार आहे. या पर्यटन मार्गामध्ये मुळशी धरण, पळसे धबधबा तसेच नयनरम्य सेल्फी पॉईंटचा समावेश करण्यात आला आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, “PMPMLचा हा उपक्रम पुणेकर आणि पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सुरक्षित, किफायतशीर आणि नियोजनबद्ध पर्यटनाची संधी या सेवेमुळे उपलब्ध होणार असून पावसाळी पर्यटनाला निश्चितच चालना मिळेल.”

पुणे महानगरपालिकेतील सर्व महिला नगरसेविकांसाठीही या विशेष पर्यटन बस सेवेच्या माध्यमातून स्वतंत्र सहलीचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचनाही महापौरांनी यावेळी केली.

PMPMLचे संचालक अजय खेडेकर यांनी महामंडळाच्या पर्यटन बस सेवेचे महत्त्व अधोरेखित केले. पावसाळ्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला वाहतूक व्यवस्थापक यशवंत हिंगे, जनसंपर्क अधिकारी नागेश गायकवाड तसेच PMPMLचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पावसाळ्यातील पर्यटनस्थळांचा सुरक्षित, आरामदायी आणि संस्मरणीय अनुभव घेण्यासाठी पुणेकरांनी ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन PMPMLच्या वतीने करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्गांचाही विचार करावा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख डॉ....

सनी देओल म्हणाले- ‘भारत माझी आई तर पाकिस्तान मावशी आहे’:चित्रपट ‘बंटवारा 1947’ च्या प्रमोशनदरम्यान विधान

चित्रपट 'बंटवारा 1947' च्या प्रदर्शनापूर्वी सनी देओल एका वक्तव्यामुळे...

आधार मूकबधिर विद्यालयातील १०३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे, दि.४ "ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत"या उद्देशाने भारतीय संस्कृती...

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा

आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणीपुणे...