आधार मूकबधिर विद्यालयातील १०३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Date:

पुणे, दि.४
“ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत”या उद्देशाने भारतीय संस्कृती संवर्धक संस्था,सेवा सहयोग आणि सणस वाडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज आधार मूकबधिर विद्यालय,बिबवेवाडी पोलीस चौकीच्या मागे,नवग्रह मंदिराजवळ,पुणे येथे शालेय साहित्य वितरण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत विद्यालयातील १०३ मूकबधिर विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या,कंपास पेटी तसेच गोष्टींची पुस्तके यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शिक्षणाला आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमास भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे विश्वस्त बाजीराव मणेरे,रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष राम बांगड,सणस वाडा प्रतिष्ठान चे अध्यक्ष तन्मय पारेकर ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा प्रभावी मार्ग असून,समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आधार मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक जयंत वानखेडे,शिक्षिका पूर्वा महाले, विश्वस्त विद्या गोखले व संस्थेचे कर्मचारी,तसेच भारतीय संस्कृती संवर्धक संस्था,सेवा सहयोग आणि सणस वाडा प्रतिष्ठानचे पदाधिकारी,स्वयंसेवक,कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.उपस्थितांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे मनापासून कौतुक करत भविष्यातही अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सनी देओल म्हणाले- ‘भारत माझी आई तर पाकिस्तान मावशी आहे’:चित्रपट ‘बंटवारा 1947’ च्या प्रमोशनदरम्यान विधान

चित्रपट 'बंटवारा 1947' च्या प्रदर्शनापूर्वी सनी देओल एका वक्तव्यामुळे...

अजित पवारांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करा

आमदार विक्रम काकडेंची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणीपुणे...

ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा राजीनामा घ्या: हर्षवर्धन सपकाळ.

पेट्रोलच्या किमतीत पाणी विकून वाहनधारकांची घोर फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान...

‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द, शिवी वा असंसदीय शब्द नाही; सार्वजनिक जीवनात वावरताना टीका सकारात्मकतेने घ्यावी: हर्षवर्धन सपकाळ

राम मंदिरातील दानपेटीवरील चोरीप्रमाणे राज्याच्या तिजोरीवरही चोरी, कर्मचारी असल्याचे...