ई-२०’ हे मोदी-गडकरी-फडणवीसांचा मोठा स्कॅम, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा राजीनामा घ्या: हर्षवर्धन सपकाळ.

Date:

पेट्रोलच्या किमतीत पाणी विकून वाहनधारकांची घोर फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी.

मुंबई-कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झाले, हे एक मोठे स्कॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजानीमा घ्यावा अशी, मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ई-२० चा निर्णय २०३० ला लागू होणे अपेक्षित होते पण मोदी सरकारमधील काही हितसंबंधित लोकांना लाभ मिळावा यासाठी घाईगडबडीत हा निर्णय लादण्यात आला. इथेनॉलऐवजी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याच्या मोठ्या तक्रारी पुढे येत आहेत. आखातातील इंधन तुटवड्याचा फायदा उचलण्यासाठी मोठा घोटाळा केल्या, त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे. नितीन गडकरी यांच्या हट्टामुळे अनेक वाहनं बंद पडली, इथेनॉलची वकिली करणारी व्यक्ती नितीन गडकरीच आहेत तसेच या घोटाळ्यात अनेक दलालही आहेत, त्यांचाही लवकरच पर्दाफाश होईल. पेट्रोलच्या किंमतीत पाणी विकून लोकांनी मोठी फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले..

RSS चा अजेंडा राबवण्यासाठी फडणवीस दिल्लीला !

देवेंद्र फडणवीस यांच्याबदद्ल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचे कारस्थान सुरु आहे, आणि त्यांनाही दिल्लीत जाण्याची घाई झालेली आहे. हिंदी लादण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग होता. महायुती सरकारमध्ये त्यांची विकेट काडण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शाह आहेत, फडणवीस शॅडो मुख्यमंत्री आहेत. भाजपा आरएसएसलाही त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी रेशीम बागेचा खास माणूस हवा आहे व ते फडणवीस आहेत. मनुस्मृतीतील श्लोक टाकणे, चार्तुवर्ण व्यवस्था पुन्हा आणणे, संविधान व शिक्षणव्यवस्था बदलण्यासाठी फडणवीस हेच योग्य व्यक्ती आहेत, म्हणून दिल्लीत त्यांना शिक्षणमंत्री बनवण्याचा घाट घातला जात आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले..

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्गांचाही विचार करावा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक अध्यासनाचे प्रमुख डॉ....

PMPMLची ‘वर्षा सहल’ विशेष पर्यटन बस सेवा सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

मुळशी धरण, पळसे धबधबा आणि नयनरम्य सेल्फी पॉईंटचा प्रवास;...

सनी देओल म्हणाले- ‘भारत माझी आई तर पाकिस्तान मावशी आहे’:चित्रपट ‘बंटवारा 1947’ च्या प्रमोशनदरम्यान विधान

चित्रपट 'बंटवारा 1947' च्या प्रदर्शनापूर्वी सनी देओल एका वक्तव्यामुळे...

आधार मूकबधिर विद्यालयातील १०३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे, दि.४ "ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत"या उद्देशाने भारतीय संस्कृती...