पुण्यात जोरदार, दमदार पाऊस; चारही धरणे ९६.४३ टक्के भरली, मुठा नदीला पूर

Date:

खडकवासला धरणसाखळीत २८.११ टीएमसी पाणीसाठा; गतवर्षापेक्षा २.६३ टीएमसी अधिक
मुठा नदीतील विसर्ग रात्री आठपासून ३७ हजार ५९८ क्युसेक

पुणे, दि. ३१ जुलै : खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा २८.११ टीएमसीपर्यंत पोहोचला असून, चारही धरणे मिळून ९६.४३ टक्के भरली आहेत. गतवर्षी याच दिवशी धरणसाखळीत २५.४८ टीएमसी म्हणजे ८७.४१ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षापेक्षा २.६३ टीएमसी अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

खडकवासला धरण परिसरासह पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारीही पावसाचा जोर कायम राहिला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत चारही धरणांमध्ये एकूण १ हजार ४६६ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक नोंदविण्यात आली.

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणात १.९७ टीएमसी म्हणजे १०० टक्के पाणीसाठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात ५९ मिलिमीटर, तर हंगामात आतापर्यंत ६४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात ८११ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू होती.

मुठा नदीतील विसर्ग कमी केला

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात सायंकाळी पाच वाजता ४३ हजार ५७१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र, धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने घट होत असल्याने रात्री आठ वाजल्यापासून हा विसर्ग कमी करून ३७ हजार ५९८ क्युसेक करण्यात आला आहे.

पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग पुन्हा कमी किंवा वाढविण्यात येऊ शकतो, असे खडकवासला पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. खडकवासला धरणातून आतापर्यंत सांडव्यावरून एकूण ४.०९ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.

खडकवासला धरणातून नवीन मुठा उजवा कालव्याद्वारे १ हजार ५४ क्युसेक आणि पुणे शहरासाठी ५५८ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

पानशेत आणि वरसगाव धरणेही काठोकाठ

पानशेत धरणात १०.५१ टीएमसी म्हणजे ९८.६७ टक्के पाणीसाठा झाला आहे. पानशेत परिसरात दिवसभरात १२१ मिलिमीटर, तर हंगामात आतापर्यंत १ हजार ७९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात ३३३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू होती.

पानशेत धरणाच्या सांडव्यावरून १८ हजार ११५ क्युसेक आणि वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

वरसगाव धरणात १२.४७ टीएमसी म्हणजे ९७.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. वरसगाव परिसरात १०९ मिलिमीटर, तर हंगामात आतापर्यंत १ हजार ६९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात २५९ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होत होती.

वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून ५ हजार २०० क्युसेक आणि वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

टेमघर धरण ८५ टक्क्यांवर

टेमघर धरणात ३.१५ टीएमसी म्हणजे ८५.०५ टक्के पाणीसाठा झाला आहे. टेमघरच्या पाणलोट क्षेत्रात दिवसभरात १०९ मिलिमीटर, तर हंगामात आतापर्यंत सर्वाधिक २ हजार ४२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणात ६३ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक सुरू होती.

नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन

मुठा नदीतील विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रामध्ये जनावरे, वाहने किंवा अन्य साहित्य असल्यास ते तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावे. नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली…
पुण्यातील भिडे पूल दुपारी पाण्याखाली गेला . पुण्याजवळील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जात आहे आणि त्यामुळे नदीपात्रातले रस्ते बंद करण्यात आले आहेत. खडकवासला धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यातआला , धरणाचे ११ दरवाजे ३ फुटांनी उघडण्यात आले आहेत. ३५,००० क्युसेक्सने विसर्ग सुरू होता टप्प्याटप्प्याने वाढवून ४५,००० क्युसेक्स करण्यातआला . खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणे १०० टक्के भरली आहेत,

नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली

मुठा नदीपात्रात ४५,००० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीपात्रातील रस्ते, पूल आणि अनधिकृत बांधकामे येथे पाणी शिरले . या पार्श्वभूमीवर महापालिका व जिल्हा प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आणि सहाय्य मदत कार्य तातडीने सुरु केले .

धरण क्षेत्रातील पर्जन्यमान :
गेल्या २४ तासांत खडकवासला येथे ६५ मि.मी., पानशेत येथे १३३ मि.मी., वरसगाव येथे ११५ मि.मी. व टेमघर येथे १२० मि.मी. पर्जन्याची नोंद झाली आहे. दि. १ जून २०२६ पासून आजपर्यंत अनुक्रमे ६३२ मि.मी., १८०२ मि.मी., १७०३ मि.मी. व २४३३ मि.मी. इतक्या एकूण पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमानाचा विचार करून धरणांतील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी खालीलप्रमाणे विसर्ग करण्यात येत आहे –

  • पानशेत धरण : जलविद्युत गृहातून ६०० क्यूसेक व सांडव्याद्वारे विसर्ग आज रात्री ८.१५ वाजल्यापासून १२,२५० क्यूसेकवरून कमी करून ८,२४० क्यूसेक करण्यात आला आहे.
  • वरसगाव धरण : जलविद्युत गृहातून ६०० क्यूसेक व सांडव्याद्वारे विसर्ग ५,२०० क्यूसेकवरून कमी करून २,७०० क्यूसेक करण्यात आला आहे.
  • खडकवासला धरण : धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने अतिरिक्त पूरपाणी अडविण्यासाठी जागा उपलब्ध नाही. पावसाचा जोर कमी झाल्याने आज रात्री ८.०० वाजल्यापासून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणारा विसर्ग ४३,५७१ क्यूसेकवरून कमी करून ३७,५९८ क्यूसेक करण्यात आला आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर छापे टाकले?”; तुकाराम मुंढेंच्या FDAला हायकोर्टाचा सवाल

मंत्रालयातील कँटीन ‘९८ टक्के स्वच्छ’ असल्याचा दावा प्रत्यक्ष पाहणीत...

‘ही पौर्णिमा स्वरांची’मध्ये अजरामर गीतांनी जागविल्या सांगीतिक स्मृती

हिंदू महासभा आयोजित आणि स्वच्छंद पुणे प्रस्तुत कार्यक्रमात रसिकांनी...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान थेऊर येथे संपन्न

सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना लाभ पुणे, दि.३१: राज्य शासनाच्या महसूल...

‘ऑपरेशन म्यूल हंट’चा पुण्यात धडाका; १३२ म्यूल खातेधारकांवर गुन्हे, १५२ आरोपी अटकेत

सायबर गुन्हेगारांचे आर्थिक जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पुणे पोलिसांची मोहीम;...