छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान थेऊर येथे संपन्न

Date:

सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना लाभ

पुणे, दि.३१: राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त व १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या महसूल दिनाचे औचित्य साधून अप्पर तहसील कार्यालय लोणी काळभोर तालुका हवेली यांच्या कार्यक्षेत्रामध्ये श्री क्षेत्र थेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबाराचे उद्घाटन शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर आबा कटके आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात एकूण १० स्टॉलच्या माध्यमातून १ हजार ४६५ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
यावेळी हवेली उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ.यशवंत माने, रजा राखीव उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर , उपविभागीय अधिकारी भोर डॉ. खरात तसेच पंचायत समिती हवेलीचे सभापती युवराज काकडे, उपसभापती विद्या गायकवाड आणि तालुक्यातील शासकीय विभागातील कार्यालय प्रमुख व पंचायत समिती सभापती, उपसभापती व जिल्हा व पंचायत समिती सदस्य आदी उपस्थित होते.

तहसील कार्यालयातील संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग, सेतू कार्यालय व महसूल विभाग उपस्थित होता. तसेच तालुक्यातील सर्व गावांचे ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय महावितरण विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव, भूमी अभिलेख कार्यालय, वन विभाग, पीएमआरडीए व इतर उपस्थित होते.
अनुसूचित जमातीतील समाजातील १३४ नागरिकांना जातीचा दाखल्यांचे वितरण

शिबिरात विशेषतः अनुसूचित जमातीतील भिल्ल आणि फासेपारधी समाजातील १३४ नागरिकांना जातीचा दाखल्यांचे वितरण करण्यात आले. आजपर्यंत अपर तहसील कार्यालय लोणी काळभोर यांच्यावतीने अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांकरिता सात शिबाराचे आयोजन करून दीड हजर राहून अधिक जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. याबाबत आदिवासी सामाजिक कार्यकर्ते श्री नामदेव भोसले यांनी याबाबत समाधान व्यक्त केले व प्रशासनाचे आभार मानले.

श्री. डुडी यांच्या संकल्पनेतून १ ॲागस्ट रोजी महसूल दिन साजरा करताना जिल्ह्यामधील उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान त्यांना प्रशस्तीपत्रक व ट्रॉफी देऊन करण्यात आला.पुणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार राजेंद्र नजन व इतर अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या निमित्ताने पुणे शहराच्या आजूबाजूच्या भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजनाकडून तात्काळ देण्यात येईल, असे आश्वासन माननीय जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिले.

या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. यामध्ये वृद्धापकाळ, विधवा, दिव्यांग योजना, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, आधार लिंक आदी विविध सेवांचा समावेश होता.
नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली, नागरिकांनी शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कुचिपुडीच्या विविध पैलूंचा अभूतपूर्व रंगमंचीय कलाविष्कार

गणेश कौत्वम, कृष्ण शब्दम आणि तरंगम्‌मधून सयुजाचा कुचिपुडी रंगप्रवेशम् समार्चना...

‘समोरचा हिंदू असेल तरच त्याच्याकडून सामान घ्या’; नितेश राणेंचे वक्तव्य

‘आमच्या सरकारमध्ये आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल; हिंदूंना त्रास...

हजारो कोटींचा आमदार झाला ‘भिकारी’; घाटकोपरच्या रस्त्यावर पराग शहांचा वेगळा प्रयोग

गुरूंच्या शिकवणीतून आत्मपरीक्षणाचा प्रयत्न; वेशांतर करून नागरिकांकडून घेतली मदत,...