विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

Date:

पुणे :

विजय पटवर्धन फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय विनोदमूर्ती प्रकाश इनामदार स्मृती करंडक एकांकिका स्पर्धा- २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील हौशी रंगकर्मी, नाट्यसंस्था आणि युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते.दि. ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ आणि ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ या काळात ही स्पर्धा होणार आहे.यंदाचे हे स्पर्धेचे पाचवे वर्ष  आहे.अधिक माहितीसाठी विजय पटवर्धन (९८२२२ ५२९१२), अभिजित इनामदार (९३२६९ ८९८३५) किंवा धनंजय अमोणकर (९३७०१ ०२४४५) यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन फाऊंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे.     

मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेते आणि विनोदी कलावंत प्रकाश इनामदार यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेला दरवर्षी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आलेला आहे. 

स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या संघांसाठी आकर्षक करंडक आणि रोख पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे. सांघिक प्रथम पुरस्कार म्हणून ‘विनोदमूर्ती प्रकाश इनामदार’ स्मृती करंडक व रुपये २५,०००, सांघिक द्वितीय पुरस्कार ‘विनोदवल्ली प्रदीप पटवर्धन’ स्मृती करंडक व रुपये २०,०००, सांघिक तृतीय पुरस्कार ‘विवेक बाघ’ स्मृती करंडक व रुपये १५,००० आणि सांघिक चतुर्थ पुरस्कार ‘निर्मला श्रीनिवास’ स्मृती करंडक व रुपये १०,००० प्रदान करण्यात येणार आहेत.याशिवाय सर्वोत्तम प्रायोगिक एकांकिकेसाठी ‘भालचंद्र पानसे’ स्मृती करंडक व रुपये १०,००० तसेच सर्वोत्तम शिस्तबद्ध संघासाठी ‘भारती गोसावी’ स्मृती करंडक व रुपये ५,००० असे विशेष पुरस्कारही देण्यात येणार आहेत.स्पर्धेसाठी अर्ज वितरणास सुरुवात झाली असून इच्छुक नाट्यसंस्था आणि रंगकर्मी यांनी लवकरात लवकर अर्ज भरावेत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

राज्यातील एकांकिका चळवळीला नवे बळ देणारी आणि नव्या कलावंतांना संधी उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा यंदाही रंगकर्मींसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘ऑपरेशन म्यूल हंट’चा पुण्यात धडाका; १३२ म्यूल खातेधारकांवर गुन्हे, १५२ आरोपी अटकेत

सायबर गुन्हेगारांचे आर्थिक जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पुणे पोलिसांची मोहीम;...

हिंजवडीत अनधिकृत होर्डिंग्जवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा; लक्ष्मी चौकातील आठ फलक हटविले!

कारवाईच्या धास्तीने सहा फलक मालकांनी स्वतःहून काढले; उर्वरित दोन...

वीज पुरवठा आदी समस्या तातडीने सोडवाव्यात

आमदार शिरोळे यांच्या महावितरण अधिकाऱ्यांना सूचना पुणे : सोसायट्यांमध्ये भूमिगत...

राज्य सरकारकडून डिजिटल मिडियाचा वापर :वृत्तपत्रे व नियतकालिके पूर्णपणे बंद

मुंबई- महाराष्ट्र सरकारने डिजिटल प्रशासनाकडे पाऊल टाकत कागद आणि...