गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला कलावर्धिनीचा ‘अनुग्रह’ भरतनाट्यम् नृत्याविष्कार!

Date:

डॉ.सुचेता भिडे-चाफेकर यांच्यासह ५० हून अधिक कलाकारांचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण

पुणे :

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि कलावर्धिनी डान्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘अनुग्रह’ या विशेष भरतनाट्यम् नृत्याविष्काराला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यशवंतराव चव्हाण नाट्यगृह,कोथरूड येथे  दि.२९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी  झालेल्या या कार्यक्रमात भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरा,गुरू–शिष्य नाते आणि भक्तिरस यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.

कर्नाटक संगीत परंपरेतील महान संत-संगीतकार आणि कर्नाटक संगीत त्रिमूर्तींपैकी एक असलेल्या श्री मुथुस्वामी दीक्षितार यांच्या २५० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या निवडक रचनांवर आधारित भरतनाट्यम् सादर करून त्यांना अभिवादन करण्यात आले.त्यांच्या संगीत,काव्य,तात्त्विक विचार आणि भक्तिभावाचे प्रभावी दर्शन नृत्याविष्कारातून घडले.ज्येष्ठ भरतनाट्यम् गुरू डॉ.सुचेता भिडे-चाफेकर यांच्या नृत्य सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.तसेच कलावर्धिनी डान्स कंपनीच्या ५० हून अधिक नृत्यांगना, प्रशिक्षक आणि विविध पिढ्यांतील शिष्यांनी एकत्रित सादर केलेल्या भव्य समूहनृत्याने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली.अरुंधती पटवर्धन यांनी स्वागत केले.हा कार्यक्रम विनामूल्य होता. 

यावेळी बोलताना ज्येष्ठ भरतनाट्यम् गुरू डॉ.सुचेता भिडे-चाफेकर म्हणाल्या,’भारतीय संस्कृतीत गुरू हे केवळ ज्ञान देणारे नसून व्यक्तिमत्त्व घडविणारे, साधनेला दिशा देणारे आणि कलेतील मूल्यांची जपणूक करणारे दीपस्तंभ आहेत.गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. ‘अनुग्रह’ या नृत्याविष्कारातून आम्ही गुरू–शिष्य परंपरेचे पावित्र्य,मुथुस्वामी दीक्षितार यांच्या अद्वितीय संगीत वारशाला अभिवादन आणि भारतीय शास्त्रीय कलेची अखंड परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.विविध पिढ्यांतील शिष्यांना एकाच मंचावर सादरीकरणाची संधी मिळणे, हीच आमच्यासाठी गुरूंच्या अनुग्रहाची खरी अनुभूती आहे.’

‘अनुग्रह’ हा केवळ भरतनाट्यम् नृत्याविष्कार न ठरता गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा,भारतीय गुरू–शिष्य परंपरेचा गौरव करणारा आणि अध्यात्म,साधना व कलात्मक उत्कृष्टतेचा उत्सव ठरला.विविध पिढ्यांतील शिष्यांनी आपल्या गुरूंना नृत्यरूपाने अर्पण केलेली आदरांजली उपस्थित रसिकांच्या मनाला स्पर्शून गेली.कार्यक्रमाला कला,संस्कृती आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारासाठी आरक्षण कायम ठेवण्यास स्थायी समितीची मान्यता

पुणे, मंगळवार पेठेतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) भूखंडावरील...

पु. ल. देशपांडे उद्यानात वृक्षतोड व लाकूड चोरी:दोषींवर कठोर कारवाई करा

शहरातील उद्यानांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्या : श्रीनाथ भिमाले पुणे...

गुरुपौर्णिमेनिमित्त रंगला कलावर्धिनीचा ‘अनुग्रह’ भरतनाट्यम् नृत्याविष्कार!

डॉ.सुचेता भिडे-चाफेकर यांच्यासह ५० हून अधिक कलाकारांचे मंत्रमुग्ध करणारे...

स्वच्छता स्पर्धेत १५ क्षेत्रीय कार्यालयांची चुरस ; विजेत्यांसाठी ९० लाखांचा निधीला मान्यता

पुणे-लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता...