पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर:27 वर्षीय मॉडेल,मुंबईतील विद्यार्थी आंदोलनात ठामपणे उभी राहिली

Date:

मुंबई-मुंबईतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनसमोर ठामपणे उभे राहत ती रोखणारी 27 वर्षीय मॉडेल रिया अहिर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. शिवाजी पार्क परिसरातील या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, अनेकांनी तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना रिया अहिरने सांगितले की, ती सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजी पार्ककडे जात होती. त्यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी भरलेली पोलिसांची व्हॅन तिला दिसली. विद्यार्थ्यांना विनाकारण ताब्यात घेतल्याचे तिला वाटले आणि घोषणाबाजी ऐकताच ती धावत जाऊन थेट व्हॅनसमोर उभी राहिली.

तिने सांगितले की, पोलिसांशी तिची यावेळी जोरदार शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी काही अंतरावर नेल्यानंतर विद्यार्थ्यांना सोडून देऊ, असे सांगितले. मात्र, तसेच करायचे असेल तर त्यांना तत्काळ का सोडत नाही, असा प्रश्न तिने पोलिसांना विचारला. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर पोलिसांकडे नव्हते, असा दावा तिने केला.

विद्यार्थी आंदोलनादरम्यान दादरमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आंदोलकांना ताब्यात घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनासमोर एका तरुणीने उभे राहत वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर शेअर करत मुंबईची हिंमत अशी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी पोलीस वाहनासमोर काही काळ उभी राहिल्याचे दिसत आहे. त्यानंतर आणखी काही आंदोलक तिच्यासोबत आल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये या घटनेनंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याबाबत मुंबई पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती किंवा स्वतंत्र निवेदन जारी केलेले नाही.

दादरमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले.

आपल्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पाहताच एका तरुणीने थेट पोलीस व्हॅनसमोर उभे राहत वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. ती काही काळ घोषणाबाजी करत व्हॅनसमोर ठामपणे उभी राहिली. त्यावेळी तिच्या समर्थनार्थ इतर काही तरुणही पुढे आले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या आंदोलकांनी चित्रित केला. हा व्हिडिओ नंतर विविध सोशल मीडिया खात्यावरून शेअर करण्यात आला. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेक नेटकऱ्यांनी त्यावर समर्थन, टीका आणि विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरकारचे हस्तक असल्यासारखे वागू नका, महाराष्ट्रात पोलीस राज खपवून घेणार नाही: हर्षवर्धन सपकाळ

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणाऱ्या...

सुमीत राघवनचा संताप; म्हणाला, ‘लोकशाही आहे की नाही?’

मुंबई - सध्या देशभरात दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाची चर्चा...