जनता दरबारच्या माध्यमातून ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा कोथरुडकरांशी संवाद

Date:

समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून कोथरुडमधील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी महापालिका तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित तक्रारी नागरिकांनी मांडल्या. त्यावर ना. पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याचे निर्देश दिले.

जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी आपल्या समस्या तत्परतेने ऐकून घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनांबद्दल समाधान व्यक्त केले. शासन आणि प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू असलेला हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा ठरत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “कोथरुड हे माझे कुटुंब आहे आणि या कुटुंबप्रमुख या नात्याने येथील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवणे ही माझी नेहमीच प्राथमिकता आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून प्रशासन अधिक लोकाभिमुख, संवेदनशील आणि उत्तरदायी बनविण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न राहील.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदी सरकार ‘संविधान विरोधी’ असल्याचा वारंवार प्रत्यय.. एनडीए मित्र पक्षांनी वेळेत बोध घ्यावा ..!- काँग्रेसची टिका,एनडीए घटक पक्षांना इशारा..

शिक्षण मंत्र्याना वाचवण्यात मोदी सरकार'चा भ्रष्टाचारी चेहरा उघड ..काँग्रेस वरीष्ठ राज्य...