सच्चा गांधीवादी, समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Date:

डॉ.कुमार सप्तर्षी यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई दि.18: – ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते, लेखक आणि तरुण पिढीचे मार्गदर्शक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे सच्चा गांधीवादी व समाजवादी ‘सप्तर्षी’ निखळला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित, शोषित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि गांधीवादी विचारांच्या प्रसारासाठी समर्पित केले. युवक क्रांती दलाच्या (युक्रांद) माध्यमातून त्यांनी तरुणांमध्ये एक नवी ऊर्जा आणि सामाजिक जाणीव निर्माण केली. डॉ.सप्तर्षी हे अच्युतराव पटवर्धन एस.एम.जोशी, ना.ग.गोरे यांच्या समाजवादी परंपरेत वाढले. महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या विचारांचे ते आयुष्यभर कट्टर अनुयायी राहिले. विविध आंदोलनांमध्ये त्यांच्या सक्रिय सहभागाने त्यांना ‘ सत्याग्रही ‘ म्हणून ओळख लाभली.

त्या पुढे म्हणाल्या की, डॉ. सप्तर्षी यांच्या लेखनाने आणि भाषणांनी अनेकांना प्रेरित केले. त्यांच्या सामाजिक बांधिलकी आणि साधेपणाने ते सर्वांचे आदर्श होते. लोकशाही मूल्यांचा आग्रह धरत असतानाच सामाजिक न्यायाच्या लढ्यातही ते कायम अग्रेसर असत. विधानपरिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सभागृहात उमटवलेली छाप आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर केलेला संघर्ष कायम स्मरणात राहील. डॉ.सप्तर्षी यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन; सोमवारी गांधी भवनमध्ये अंत्यदर्शन

युवक क्रांती दलाचे संस्थापक, माजी आमदार आणि ‘सत्याग्रही विचारधारा’चे...

वांगचुक यांच्या पत्नीची सोशल मिडियावर तक्रार

नवी दिल्ली-सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंगमो यांनी...