दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ १ ते २ टक्के वाढ – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

Date:

  • कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार
  • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळासंदर्भात महिनाभरात पर्याय

मुंबई, : मुंबई महानगर प्रदेशातील महानगरपालिका क्षेत्रातील नाट्यगृहांच्या भाड्यामध्ये दरवर्षी करण्यात येणारी 5 टक्क्याची भाडेवाढ आता केवळ 1 ते 2 टक्के करण्याबाबत फेरविचार करण्यात येणार असून, भाडेवाढीचा आधार हा कोविडपूर्वीचा मूळ दरच मानण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. मराठी नाट्यसृष्टीच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नावर महिनाभरात व्यवहार्य पर्याय सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्रालयात यासंदर्भातील बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, अभिनेते प्रशांत दामले, निर्माते प्रसाद मच्छिंद्र कांबळी तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाचे प्रतिनिधी, विविध महानगरपालिकांचे अधिकारी आणि संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकांच्या नाट्यगृहांच्या वीज, देखभाल व दुरुस्तीवरील वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर मराठी नाट्यसृष्टीचे हित आणि महानगरपालिकांची आर्थिक शाश्वतता यांचा समतोल राखण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी दिले. भाडेवाढीचा आधार कोविडपूर्वीचा मूळ दर ठेवण्यात येणार असून, दरवर्षांनी 5 टक्के भाडेवाढ करण्याऐवजी दरवर्षी केवळ 1 ते 2 टक्के भाडेवाढ करण्याच्या प्रस्तावावर संबंधित महानगरपालिका व स्थायी समित्यांनी फेरविचार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत नाट्य व्यावसायिकांनी दादर, परळ, लालबाग, शिवडी परिसरात नाट्यसाहित्य, नेपथ्य आणि बस पार्किंगसाठी कायमस्वरूपी जागेची मागणी केली. सध्या उपलब्ध जागा अपुरी असून अनेक वर्षांपासून गोडाऊन व वाहनतळाचा प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. पावसाळ्यात नेपथ्याचे नुकसान होत असल्याने तसेच व्यावसायिक दराने गोडाऊन घेणे शक्य नसल्याने शासन किंवा महानगरपालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. शेलार यांनी मानखुर्द येथील अतिक्रमणमुक्त जागेवरील फिल्मसिटीला देण्यात येणाऱ्या जागांपैकी काही जागा नाट्यसृष्टीसाठी गोडाऊन आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देता येईल का, याबाबत महिनाभरात व्यवहार्य पर्याय सादर करण्याचे निर्देश दिले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनीही पर्यायी जागेचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले.

नाट्यगृहांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प, एलईडी जाहिरात फलक आणि इतर उत्पन्नवाढीच्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यासाठी महानगरपालिकांनी पुढील तीन महिन्यांत विशेष समिती स्थापन करावी, असेही निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related