संगीत सेवा म्हणजे कलाकाराचा स्वतःचाच शोध

Date:

ज्येष्ठ बासरीवादक पद्मश्री पंडित रोणू मजुमदार : भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे सन्मान
पुणे : भारतीय संगीत हे विशाल सागराप्रमाणे आहे. कोणत्याही कलाकाराला संपूर्ण संगीत एका आयुष्यात आत्मसात करणे अशक्य आहे. गायक, वादक किंवा नृत्यकलाकार असो, प्रत्येकाने सर्वप्रथम संगीताचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. संगीत सेवा म्हणजे एक प्रकारे कलाकाराचा स्वतःचाच शोध असतो, असे मत ज्येष्ठ बासरीवादक पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे पंडित रोणू मजुमदार यांच्या सन्मान सोहळ्याचे तसेच बासरी वादन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे प्रमुख पंडित शारंगधर साठे, पंडित अरुण कशाळकर आदी उपस्थित होते.

संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंडित अरुण कशाळकर यांचा, तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल पंडित रोणू मजुमदार यांचा स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे सत्कार करण्यात आला.

पंडित रोणू मजुमदार म्हणाले, भारतीय संगीत क्षेत्रात गायन ही सर्वश्रेष्ठ कला आहे. प्रत्येक कलाकाराने गायनाचे अंग शिकले पाहिजे. आज अनेक बासरीवादक आणि विद्यार्थी केवळ प्रसिद्ध बासरीवादकांनाच ऐकतात. त्यामुळे त्यांच्या कलेत पूर्णता येत नाही. सर्वसमावेशकता येण्यासाठी प्रत्येक बासरीवादकाने गायनाचे शिक्षण घेणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रात संघर्ष अटळ असतो. त्या संघर्षातून मिळणारे अनुभवच कलाकार घडवतात. कलाकार होणे सोपे नसते.

शारंगधर साठे म्हणाले, भारती विद्यापीठाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सने तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे गेल्या १८ वर्षांत अनेक गुणी कलाकार आणि विद्यार्थी घडले आहेत. पंडित रोणू मजुमदार यांचे पुत्र ऋषिकेश मजुमदार हेदेखील याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. संस्थेच्या वाटचालीत पंडित रोणू मजुमदार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.

पंडित अरुण कशाळकर म्हणाले, कलाकार म्हणून यशाला कोणतीही मर्यादा नसते. मात्र प्रत्येक कलाकाराला स्वतःचे समाधान शोधता आले पाहिजे. पुरस्कार मिळत असतात; मिळाले नाहीत तरी आपल्या कलेचे सादरीकरण करून त्यातून समाधान मिळवणे अधिक महत्त्वाचे आहे.

कार्यक्रमात हेमंत जोशी (तबला) आणि कल्पेश (बासरी) यांनी पंडित रोणू मजुमदार यांना साथ-संगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारंगधर साठे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण कासलीकर यांनी केले. 

पंडित रोणू मजुमदार यांनी शास्त्रीय संगीतातील आलाप, जोड, झाला आणि गत वादनाचे तंत्र, त्यामागील विचार व बारकावे प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले. तसेच रागसंगीत, सुगम संगीत आणि चित्रपट संगीतात बासरीवादनाच्या विविध शैलींचे सादरीकरण करून त्यातील सूक्ष्म पैलू उलगडले. रागाचे चलन जपण्याचे महत्त्व आणि प्रभावी सादरीकरणाची पद्धत याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बांधकाम कामगारांसाठीच्या नव्या कल्याणकारी योजनांचे डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून स्वागत

प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमांमध्ये सुधारणा आणि 'पायलट प्रोजेक्ट'ची मागणी मुंबई,...

मुख्य मंत्र्यांच्या निव्वळ घोषणाच:हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोकोणासाठी थांबविली?

 माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची...

पुण्यधाम आश्रमात वारकऱ्यांचे स्वागत:६०० हून अधिक वारकरी व भाविकांची सेवा

पुणे-पुण्यधाम आश्रमात श्री विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायाच्या पंढरपूरच्या पवित्रवारीनिमित्त...

तळजाईच्या नसात पसरतोय काँक्रीटचा कॅन्सर ! अधिकाऱ्यांच्या संमतीने निसर्गाचा खून, आयुक्तसाहेब तुम्ही का हो गप्प !

उघड्या डोळ्यांनी पुणेकर पाहताहेत तळजाईची ही दुर्धर अवस्था… विशेष शोधनिबंध...