मुख्य मंत्र्यांच्या निव्वळ घोषणाच:हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोकोणासाठी थांबविली?

Date:

 माजी आमदार मोहन जोशी यांचा सवाल

पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली असतानाही मेट्रो मार्गावर अजून धावू लागलेली नाही, ती कोणासाठी थांबविली आहे? असा सवाल माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी महामेट्रोला केला आहे.

मेट्रोचा पहिला टप्पा मे महिन्यात आणि दुसरा टप्पा जुलै महिन्यात सुरू होईल, अशी घोषणा मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केली होती. प्रत्यक्षात त्या घोषणेची अंमलबजावणी झालीच नाही. १५ जुलैला पहिला टप्पा तरी सुरू होईल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. तेही नियोजन कोलमडले आहे, असा आरोप मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यासाठी पुणे विमानतळावरील टर्मिनल विलंबाने कार्यान्वीत केले. त्याच प्रमाणे भाजपला मेट्रोचे श्रेय घेण्यासाठी आणि गाजावाजा करण्यासाठी हिंजवडी-शिवजीनगर मेट्रो सुरू करण्यासाठी मुहूर्त पाहिला जात आहे का? अशी विचारणा मोहन जोशी यांनी केली आहे .

हिंजवडी-शिवाजी नगर मेट्रो मार्च २०२५ मध्ये धावू लागेल असे कामाचे मूळ वेळापत्रक होते. त्यानंतर सव्वा वर्ष उलटून गेले तरी मेट्रोची प्रतिक्षाच करावी लागत आहे. मार्च नंतर सप्टेंबर २०२५, डिसेंबर  २०२५, मार्च २०२६, मे २०२६, १५ जून  २०२६, १५ जुलै २०२६ अशा वेगवेगळ्या तारखा उदघाटनासाठी म्हणून जाहीर झाल्या. या निव्वळ घोषणाच ठरल्या. भाजप सरकारच्या पोकळ घोषणाबाजीचा आणि ढिसाळ कारभाराचा हा नमुना आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संगीत सेवा म्हणजे कलाकाराचा स्वतःचाच शोध

ज्येष्ठ बासरीवादक पद्मश्री पंडित रोणू मजुमदार : भारती विद्यापीठ...

पुण्यधाम आश्रमात वारकऱ्यांचे स्वागत:६०० हून अधिक वारकरी व भाविकांची सेवा

पुणे-पुण्यधाम आश्रमात श्री विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायाच्या पंढरपूरच्या पवित्रवारीनिमित्त...

तळजाईच्या नसात पसरतोय काँक्रीटचा कॅन्सर ! अधिकाऱ्यांच्या संमतीने निसर्गाचा खून, आयुक्तसाहेब तुम्ही का हो गप्प !

उघड्या डोळ्यांनी पुणेकर पाहताहेत तळजाईची ही दुर्धर अवस्था… विशेष शोधनिबंध...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये – गोपाळदादा तिवारी

एमपीएससी परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला कॉँग्रेसचा पाठिंबा ..!आंदोलना...