२२ जुलैपर्यंत पाणीकपात रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय – महापौर मंजुषा नागपुरे

Date:

पुणे |

पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापौर मंजुषा नागपुरे यांनी शहरातील पाणीकपात २२ जुलै २०२६ पर्यंत रद्द ठेवण्याच्या सूचना पुणे महानगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २२ जुलैपर्यंत पुणेकरांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती देताना महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितले की, २२ जुलैनंतर भारतीय हवामान विभागाने वर्तविलेला पावसाचा अंदाज, धरणांतील उपलब्ध पाणीसाठा, पाण्याची आवक तसेच एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्यात येईल.

महापौरांनी पुणेकरांना पाणीपुरवठा नियमित सुरू असला तरी पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीने व काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून, तिचा अपव्यय टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे, असेही त्यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगला IPO साठी सेबीची मंजुरी

12 हजार कोटींच्या ऑर्डर बुकसह बाजारात उतरणार; ऊर्जा, संरक्षण,...

पेणच्या गणेशमूर्ती कलाकारांच्या व्यथेची आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल

२०२१ प्रमाणे विशेष मदत पॅकेजची मागणी; पूरग्रस्त मूर्तिकारांना तातडीने...

कारची काच फोडून चोरी करणारी परराज्यातील टोळी जेरबंद; विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पुण्यातील विमानतळ पोलिसांनी कारची काच फोडून चोरी...