पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात एटीएसची 65 ठिकाणी छापेमारी:पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीचे नेटवर्क उद्ध्वस्त

Date:

पुणे-महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 23 हून अधिक ठिकाणी, तर राज्यात एकूण 65 ठिकाणी मोठी छापेमारी केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संशयास्पद नेटवर्कशी संबंधित देशविघातक कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. एटीएसने अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या सूचनेवरून शहजाद भट्टी आणि त्याचे साथीदार भारतात छुपे नेटवर्क चालवत होते. हे संशयित फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून भारतीय तरुणांच्या संपर्कात येत होते.

तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी प्रवृत्त करण्यासाठी त्यांना सुरुवातीला पैशांचे आमिष, प्रसिद्धी किंवा परदेशात स्थायिक होण्याच्या भूलथापा दिल्या जात होत्या. अनेक बेरोजगार आणि संवेदनशील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जात होता.

एटीएसने 10 जुलै 2026 रोजी पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक आणि इतर शहरांसह राज्यभरात एकाच वेळी धाडी टाकून मोठी मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण राज्यातून जवळपास 112 हून अधिक संशयित लोकांची कसून चौकशी करण्यात आली आहे.

पुण्यात यापूर्वी चाकण, वारजे आणि शिरूर परिसरातील तरुणांची या संदर्भात चौकशी करण्यात आली होती आणि त्यांचे मोबाईल फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आले होते. शहजाद भट्टीच्या या मॉड्युलचा मुख्य हेतू भारतातील संवेदनशील ठिकाणांची माहिती मिळवणे, फोटो/व्हिडिओ गोळा करणे आणि भविष्यातील घातपातासाठी स्लीपर सेल्स तयार करणे हा होता. भारताच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या या ‘हायब्रीड वॉरफेअर’चा बिमोड करण्यासाठी एटीएसने कडक पावले उचलली असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

होर्मुझमध्ये जहाजांवर हल्ले थांबवा; भारताची इराणला कडक समज

भारतीय खलाशाचा मृत्यू; भारताशी संबंधित ११ जहाजे आणि १४८...

पुण्यात टोळक्याची दहशत,सहकारनगरमध्ये मध्यरात्री 4 मोटारींची तोडफोड: 18 जणांविरुद्ध गुन्हा

पुणे-पुण्यातील सहकारनगर भागात टोळक्याने मध्यरात्री दहशत माजवत चार मोटारींची...

‘पीएमआरडीए’ची मोई येथे सर्वात मोठी कारवाई; ६८० अनधिकृत पत्राशेड जमीनदोस्त!

३५ हेक्टर क्षेत्र अतिक्रमणमुक्त; १,००० अधिकारी-कर्मचाऱ्यांसह २० तासांची विक्रमी...