सांगवी पोलीस ठाण्यातील कथित मारहाण प्रकरण; DCP विवेक पाटील यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

Date:

‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रविराज काळे यांचे मुख्यमंत्र्यांना ईमेल; निष्पक्ष चौकशी न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पिंपरी-चिंचवड : पिंपळे निलख परिसरात दोन महिलांना कथित मारहाण झाल्याच्या घटनेनंतर सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीच्या युवा आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविराज बबन काळे यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून DCP विवेक पाटील यांच्यासह संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे.

रविराज काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पिंपळे निलख येथील शहीद अशोक कामटे उद्यान चौक परिसरात दोन महिलांना मारहाण झाल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित महिला, तक्रारदार आणि त्यांचे नातेवाईक कायदेशीर तक्रार नोंदविण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्यात गेले होते.

मात्र, तक्रार नोंदवून घेण्याऐवजी तक्रारदाराच्या मुलासह दोन नातेवाईकांना पोलीस ठाण्यातील ‘डीबी रूम’मध्ये नेऊन मारहाण करण्यात आल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. या कथित मारहाणीत DCP विवेक पाटील आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना रविराज काळे यांनी राज्य सरकारच्या महिला सुरक्षेबाबतच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. एकीकडे राज्य सरकार महिला सुरक्षेसाठी विविध योजना राबवत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या नागरिकांनाच मारहाण होत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात नियुक्ती नसतानाही DCP विवेक पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनचा वापर केला तसेच तक्रारदारांची तक्रार नोंदवून न घेता पदाचा गैरवापर करून स्वतःच्या चालकाची तक्रार नोंदवून घेतल्याचाही आरोप काळे यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी तसेच DCP विवेक पाटील, सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, घटनेच्या दिवशी कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार आणि कथित मारहाणीत सहभागी असलेल्या अन्य पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका तपासून दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

“या गंभीर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत आणि करण्यात आलेल्या कारवाईची माहिती तक्रारदारांना लेखी स्वरूपात द्यावी. अन्यथा आम आदमी पार्टी युवा आघाडी या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा रविराज काळे यांनी दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत DCP विवेक पाटील, सांगवी पोलीस ठाणे किंवा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही. संबंधितांची भूमिका समोर आल्यानंतर ती प्रसिद्ध केली जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दोन राष्ट्रीय महामार्ग ठप्प;कोकणाची वाट बंदच किती दिवस?

ताम्हिणी महामार्ग बंद करून आठ दिवस झाले; पुढे काय? पाऊस...

सासवड–जेजुरी मार्गावर भीषण अपघात; तीन वारकरी महिलांचा मृत्यू, चार जखमी

पुणे-आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर...