सासवड–जेजुरी मार्गावर भीषण अपघात; तीन वारकरी महिलांचा मृत्यू, चार जखमी

Date:

पुणे-आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांवर आज सकाळी मोठा अनर्थ ओढावला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालत निघालेल्या वारकऱ्यांना जेजुरी परिसरातील भोंगळे मळा येथे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून, चार वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

नेमका अपघात कसा झाला?

सध्या राज्यभरातून लाखो वारकरी ऊन-पावसाची तमा न बाळगता पायी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडचा मुक्काम आटोपून आज जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती. सकाळच्या वेळी अनेक वारकरी जेजुरीच्या दिशेने पायी चालत निघाले होते. या मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव एकाच बाजूने वाहने सोडली जात होती.

प्राथमिक माहितीनुसार, जेजुरी नजीकच्या भोंगळे मळा परिसरात मागून आलेल्या एका भरधाव ट्रकने वारकऱ्यांच्या टेम्पोला आणि पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात तब्बल सहा वारकरी चिरडले गेले.
३ महिला वारकऱ्यांवर काळाचा घाला

अपघात घडताच परिसरातील नागरिक आणि इतर वारकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या सर्व सहा वारकऱ्यांना तातडीने नजीकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान यापैकी तीन महिला वारकऱ्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर उर्वरित तीन जखमी वारकऱ्यांवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

अपघाताबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही वारकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे तसेच जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच या घटनेत जखमी झालेल्या वारकऱ्यांवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षेत महायुती अपयशी- विजय वडेट्टीवार

जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातावरून काँग्रेस नेत विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शासन पार पाडण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही वर्षांत वारीतील अपघातांचे प्रमाण वाढत असून, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला गती; ५ मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे डिसेंबर २०२६ अखेर सुरू करण्याचे नियोजन

११ केंद्रांपैकी ४ केंद्रे कार्यान्वित; प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्याची...

१५ ते १९ सप्टेंबर दरम्यान स्व. शांताबाई जोग राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

३१ ऑगस्ट पर्यंत मागविण्यात आले आहेत अर्ज मुंबई,...