आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी जागे झाले ..मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी : पर्यावरण विभाग व अँटोनी लारा रिन्युएबलला नोटीस द्या म्हणाले….

Date:

पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेचा पर्यावरण विभाग तसेच अँटोनी लारा रिन्युएबल या संबंधित ठेकेदार कंपनीला नोटीस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कचऱ्याचा ढीग ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळून गंभीर दुर्घटना घडली. या इमारतीत २२ तर इमारतीशेजारी असलेल्या कचऱ्याच्या ढिगाखाली १ असे एकूण २३ नागरिक अडकले होते. या पैकी इमारतीतून पाच नागरिक सुखरुप बाहेर पडले. उर्वरित अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन यांनी बचावकार्य सुरू केले. यामध्ये इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले. तर या घटनेत इमारतीत अडकलेल्या ९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या घटनेच्या सखोल चौकशी आदेश दिले आहेत. या संदर्भात आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत तात्काळ महापालिकेचा पर्यावरण विभाग व संबंधित ठेकेदार कंपनी यांना नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भाजपला ‘वन नेशन, वन पॉलिटिकल पार्टी’ हवी आहे; हा संविधान संपवून हुकूमशाही आणण्याचा डाव: हर्षवर्धन सपकाळ

बोगस बियाण्यांच्या रॅकेटला सत्ताधाऱ्यांचे संरक्षण; संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी...