खडकी शिक्षण संस्थेचे ज्ञानदानाच्या कार्यात मोलाचे योगदान : मुरलीधर मोहोळ

Date:

वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन

पुणे : पुण्याने समाजाला ज्ञानदानाचे वरदान दिले आहे. पुण्याच्या माध्यमातून ज्ञानासह क्रीडा, संस्कृती जपण्याचे कामही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये मोठामोठ्या विद्यापीठ व महाविद्यालयांचा समावेश असला तरी खडकी शिक्षण संस्थेने मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेचा ११३ वर्षांचा इतिहास महनीय आहे. खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी मोठे कार्य करणारी वंदनीय व्यक्तीमत्वे निर्माण झाली आहेत, असे गौरवोद्‌गार केंद्रीय नागरी व विमान वाहतूक, सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले.

खडकी शिक्षण संस्थेच्या वैदेही दत्ताजी गायकवाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन आज (दि. ११ जुलै) मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल होते. खडकी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, प्रसिद्ध उद्योजक दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड, उपमहापौर परशुराम वाडेकर, संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता, चिटणीस आनंद छाजेड, सहचिटणीस सुरजभान आगरवाल, खडकी कॅन्टॉनमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अभय सावंत, नगरसेवक सुनील पांडे, सपना छाजेड आदी उपस्थित होते. संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

खडकी शिक्षण संस्थेचा १९२३ साली सुरू झालेला प्रवास आज एका वटवृक्षामध्ये रूपांतरीत झालेला आहे. माजी विद्यार्थ्यांनीच मातृसंस्थेला बळकटी देण्याचे काम केले आहे, असे आवर्जून नमूद करून मुरलीधर मोहोळ म्हणाले, येथे अत्यंत गुणवत्तापूर्ण आणि सुखसुविधांनी परिपूर्ण शिक्षण लाभत असल्याने या शिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेलेली दिसते. मोहोळ पुढे म्हणाले, दत्ताजी गायकवाड यांच्या योगदानातून शिक्षण संस्थेच्या संदर्भातील विविध उपक्रमांना बळकटी मिळत आहे. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षित होणारे विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत, याविषयी अभिमान आहे.

अध्यक्षपदावरून बोलताना कृष्णकुमार गोयल म्हणाले, शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून समाज घडविण्याची शक्ती आहे या विचाराने प्रेरित होऊन खडकी शिक्षण संस्था गेली ११३ वर्षे अखंडितपणे कार्य करीत आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानासह कला व क्रीडा गुणांच्या विकासासाठी सातत्याने वाव दिला जात आहे. ही शिक्षण संस्था म्हणजे केवळ भिंती किंवा इमारत नसून एक जीवंत परंपरा आहे, जी पिढ्यान्‌पिढ्यांचा ज्ञानदानाचा वारसा अविरतपणे पुढे नेत आहे.

परशुराम वाडेकर म्हणाले, खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन, आर्थिकदृष्ट्या मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य अखंडितपणे सुरू आहे याचे कौतुक आहे.

प्रास्ताविक सचिव आनंद छाजेड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राचार्य संजय चाकणे यांनी केले तर आभार ॲड. अजय सूर्यवंशी यां

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्हिएतनाममध्ये 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली

व्हिएतनाममध्ये बोट पलटली, भारतीयांसह 15 जणांचा मृत्यू:32 भारतीय प्रवासी...

मोलकरणीने चोरलेले चार तोळे सोन्याचे दागिने हडपसर पोलिसांकडून जप्त

मास्टर बेडरूममधील बॅगेतून दागिन्यांची चोरी; ७ लाख ३० हजार...

गुलटेकडीत साडेसहा लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावली; साथीदारासह चोरटा दुचाकीवरून पसार

पुण्यात सायबर फसवणूक, खंडणी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे; रुग्णालयात...