गुलटेकडीत साडेसहा लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावली; साथीदारासह चोरटा दुचाकीवरून पसार

Date:

पुण्यात सायबर फसवणूक, खंडणी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे; रुग्णालयात शस्त्राचा धाक दाखवणाऱ्याला अटक

पुणे | प्रतिनिधी

गुलटेकडी परिसरातील एका सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ ज्येष्ठ नागरिकांच्या वॉचमनच्या हातातील साडेसहा लाखांची रोकड आणि दोन मोबाईल असलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी दुचाकीवरून पलायन केले. या बॅगेतील रोकड आणि मोबाईलसह एकूण ६ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिक गुरुवारी रात्री आठच्या सुमारास गुलटेकडीतील हर्ष रेसिडेन्सी सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ आले होते. त्यांचा वॉचमन बॅग हातात घेऊन त्यांच्यासोबत सोसायटीत जात असताना पाठीमागून पायी आलेल्या अनोळखी व्यक्तीने वॉचमनच्या हातातील बॅग हिसकावली.

त्यानंतर चोरटा जवळच दुचाकीवर थांबलेल्या साथीदाराच्या गाडीवर बसून पसार झाला. बॅगेत ६ लाख ५० हजार रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल फोन होते. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात दोन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील शेळके तपास करीत आहेत.

मोबाईल हॅक करून पावणेचार लाखांची फसवणूक

वाघोलीतील ३३ वर्षीय व्यक्तीचा मोबाईल हॅक करून अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या बँक खात्यातील पैसे परस्पर हस्तांतरित केले. या प्रकारात फिर्यादीची ३ लाख ९२ हजार ४९९ रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी खराडी पोलिस ठाण्यात बँक खातेदार आणि वापरकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

रुग्णालयात शस्त्राचा धाक दाखवून ५० हजारांची खंडणी

येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातील मथुरा हॉस्पिटलमध्ये येऊन एका व्यक्तीने ७५ वर्षीय फिर्यादीला लोखंडी शस्त्राचा धाक दाखवत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपीने रुग्णालयाबाहेरील सार्वजनिक रस्त्यावर शस्त्र हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी अमोल जीवराज पिल्ले (वय ४७, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याला अटक केली आहे.

पुणे स्टेशन परिसरात दोन मोबाईल चोरीला

पुणे स्टेशनजवळील संत तुकाराम शिंदे वाहनतळ परिसरात टॅक्सीचालकाशी बोलत असलेल्या मुंबईतील २४ वर्षीय तरुणाच्या पॅन्टच्या खिशातून ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला.

दुसऱ्या घटनेत शाहीर अमर चौकाजवळ चारचाकीतून जात असलेल्या २९ वर्षीय महिलेचे लक्ष विचलित करून दोन अनोळखी व्यक्तींनी तिच्या गाडीतून ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास बंडगार्डन पोलिसांकडून सुरू आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोलकरणीने चोरलेले चार तोळे सोन्याचे दागिने हडपसर पोलिसांकडून जप्त

मास्टर बेडरूममधील बॅगेतून दागिन्यांची चोरी; ७ लाख ३० हजार...

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतील सामूहिक ऑनलाईन पसायदानाला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक; लाखो भाविकांनी विश्वशांतीच्या...

एएफएमसीचे १४१ वैद्यकीय पदवीधर सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत दाखल

११२ अधिकारी लष्करात, १२ नौदलात, तर १७ हवाई दलात...

माया देशपांडे लिखित ‘स्मृती वर्धन’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : वृद्धापकाळात भेडसावणाऱ्या एकटेपणा व स्मृतिभ्रंशाच्या समस्येवर मात...