माया देशपांडे लिखित ‘स्मृती वर्धन’ पुस्तकाचे प्रकाशन

Date:

पुणे : वृद्धापकाळात भेडसावणाऱ्या एकटेपणा व स्मृतिभ्रंशाच्या समस्येवर मात करण्यासाठी कल्पक कार्यपुस्तिकेची निर्मिती करणाऱ्या माया देशपांडे लिखित ‘स्मृती वर्धन’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी झाले.

कोथरूडमधील गोकुळ हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. रोहिणी पटवर्धन, डॉ. श्रुती पानसे, प्रकाशक सतीश पुरंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

माया देशपांडे या सुमारे ३५ वर्षे बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कार्यरत होत्या. वृद्धापकाळात एकटेपणा जाणवू नये व विस्मरणाचा धोका टळावा यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. लेखनाविषयी बोलताना माया देशपांडे म्हणाल्या, वृद्धावस्थेत अनेकांना स्मृतिभ्रंशाच्या समस्येला सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी मेंदूला कार्यरत ठेवावे लागते. हे पुस्तक या दृष्टीने प्रत्येकास उपयुक्त ठरणार आहे.

वृद्धांसाठीच्या अभिवन कल्पनेचे कौतुक करून डॉ. रोहिणी पटवर्धन म्हणाल्या, मन आणि शरीर ही आयुष्याची दोन चाके आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचे स्वरूप बदललेले असते. यातील एक चाक जरी बिघडले तरी त्याचा परिणाम आयुष्यावर होतो. बाल, तरुणांच्या मानसशास्त्राप्रमाणे वृद्धांचेही मानसशास्त्र आहे, त्याकडेही आवर्जून लक्ष दिले गेले पाहिजे.

डॉ. श्रुती पानसे यांनी मेंदूची कार्यपद्धती सोप्या रीतीने समजावत त्याला सतत खाद्य पुरवले तर विस्मरणाचा धोका टळू शकतो, व हे पुस्तक त्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे सांगितले. सतीश पुरंदरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली वैशंपायन यांनी केले तर आभार अंजली मुळे यांनी मानले. मान्यवरांचा सत्कार माया देशपांडे, सीमा पेशवा, अंजली मुळे यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतील सामूहिक ऑनलाईन पसायदानाला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक; लाखो भाविकांनी विश्वशांतीच्या...

एएफएमसीचे १४१ वैद्यकीय पदवीधर सशस्त्र दल वैद्यकीय सेवेत दाखल

११२ अधिकारी लष्करात, १२ नौदलात, तर १७ हवाई दलात...

पुण्यात जमिनीचे घोटाळे – उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह 15 अधिकारी निलंबित

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील 'कलम 155' चा गैरवापर करून...