वारकरी, शेतकऱ्यांना सुखी ठेव; मुख्यमंत्र्यांचे पुण्यात विठुराया चरणी साकडे…

Date:

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आषाढी वारीमध्ये सहभागी होणे अतिशय सुंदर अनुभूती आहे; महाराष्ट्राच्या या परंपरेतून असीमित ऊर्जा मिळते, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका आणि श्री निवडुंगा विठोबाचे काल दर्शन घेतल्यानंतर व्यक्त केली. वारीत सहभागी झालेले वारकरी आणि शेतकऱ्यांना सुखी ठेव, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुराया चरणी घातले.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपूरे, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले,आमदार हेमंत रासणे, पुणे शहरचे पोलीस सहआयुक्त संजय दराडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प.उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे, श्री निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थानचे अध्यक्ष हिरालाल मालू, स्थानिक लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री. तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद प्राप्त केलेला आहे. संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुणे शहरातील पालखीच्या ठिकाणी असणाऱ्या अडीअडचणी पुणे महानगरपलिकेने योग्य पद्धतीने दूर केल्या आणि सुविधांचा विस्तार केला. पुढच्या वर्षी यामध्ये आणखीन विस्तार करण्यात येईल.

वारकऱ्यांनी वारीचा आनंद घेत सुखरूप पंढरपूर येथे पोहचावे, असे आवाहन करुन मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही वारी अतिशय सुखरुपपणे पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली.
टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात तल्लीन वारकरी…. ‘ग्यानबा तुकाराम’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी… अशा भक्तिमय वातावरणात पुणे शहर दुमदुमले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘DJ मुक्त गणेशोत्सव साजरा करा’ म्हणताच नागरिकाला सभागृहाबाहेर काढले; गणेश मंडळांच्या बैठकीत गदारोळ

नागरिकाच्या मागणीला मंडळांच्या कार्यकर्त्यांचा तीव्र आक्षेप; ‘यांना सभागृहातून बाहेर...

बस अपघातात मालमत्तेचे नुकसान झाल्यास पीएमपीएमएलकडून भरपाई

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वमालकीच्या बसमुळे...

पीएमपीएमएलच्या सर्व सेवकांना पेन्शन; कागदपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी; हजारो निवृत्त कर्मचारी, कुटुंबीयांना दिलासा पुणे...

‘नाट्यछटा महोत्सवा’तून ७५ कलाकारांचा रंगमंचीय आविष्कार

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान पुण्यात...