खडकवासला धरण येथे महापौरांनी केले जलपूजन;नागरिकांच्या पाणीपुरवठ्यासाठी चांगल्या पर्जन्याची प्रार्थना

Date:

पुणे, दि. ८ जुलै २०२६ : सालाबादप्रमाणे पुणे महानगरपालिकेतर्फे आज खडकवासला जलाशय येथे जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा व्हावा, तसेच नागरिकांना वर्षभर मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विधिवत जलपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार भीमराव तापकीर आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

या प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, सभासद सचिन मोरे, सोपान ऊर्फ काका चव्हाण, जयश्री भूमकर, राजाभाऊ लायगुडे, कोमल नवले, प्रसन्न जगताप, अनिता इंगळे, सुभाष नानेकर, धनश्री कोल्हे, भारत भूषण बराटे तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी महापौर श्रीमती मंजुषा नागपुरे यांनी पुणेकर नागरिकांना वर्षभर सुरळीत आणि पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे सांगत, यंदाचा मान्सून समाधानकारक ठरून धरणक्षेत्रात भरपूर पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुणे, दि. ८ जुलै : राज्य शासनाने मुख्यमंत्री वारकरी...

खड्डे, वॉटर लॉगिंग आणि पालखी तयारीवर भिमालेंचा प्रशासनाला अल्टिमेटम

‘PMC Road Mitra’वरील तक्रारीनंतर ७२ तासांत खड्डे बुजवा; ३९...