गुप्तपणे सुरू असलेल्या डान्सबारचे सखोल सर्वेक्षण करा ,महिलांचे शोषण, अल्पवयीन मुलींची तस्करी आणि कायद्यातील पळवाटा रोखण्यासाठी अंमलबजावणी करा – आमदार डॉ. नीलम गोऱ्हे”

Date:

“डान्सबारविरोधी कायदा अधिक प्रभावी करा;ऑर्केस्ट्राचाही कायद्यात समावेश स्वागतार्ह

मुंबई, दि. ८ जुलै २०२६ : महाराष्ट्र पोलीस आणि महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे व मद्यपान कक्ष (बार रूम) यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व त्यामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्यासंदर्भातील (सुधारणा) विधेयक, २०२६ वर विधानपरिषदेत चर्चा करताना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डान्सबारविरोधी कायदा अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, २००५-०६ मध्ये डान्सबारविरोधी कायदा मंजूर होत असताना त्यांनी त्याला समर्थन दिले होते. त्या कायद्यामुळे डान्सबारचे प्रमाण काही प्रमाणात कमी झाले असले, तरी आजही अनेक ठिकाणी गुप्त किंवा खासगी स्वरूपात डान्सबार सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यभर अशा ठिकाणांची सखोल पडताळणी करून वास्तवस्थिती समोर आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या सुधारणा विधेयकात ऑर्केस्ट्राचाही समावेश करण्यात आल्याचे स्वागत करताना त्यांनी महिलांचे शोषण रोखणे, अल्पवयीन मुलींची तस्करी थांबवणे आणि त्यांना डान्सबारमध्ये काम करण्यास भाग पाडणाऱ्या साखळीवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. अनेक मुलींना वेट्रेस म्हणून दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण होत असल्याचा गंभीर मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

डॉ. गोऱ्हे यांनी कायद्याच्या अंमलबजावणीत पोलिसांबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अश्लील सादरीकरण यामधील स्पष्ट फरक ओळखण्यासाठी तज्ज्ञांची मदत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अन्यथा कायद्याचा गैरसमज होऊन वैध सांस्कृतिक कार्यक्रमांनाही अडथळे निर्माण होऊ शकतात, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

डान्सबारविरोधी कायद्याला न्यायालयीन आव्हाने आणि प्रभावी लॉबींचा सामना करावा लागला असला, तरी महिलांच्या सन्मानासाठी आणि समाजहितासाठी हा कायदा अधिक कठोरपणे अंमलात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चर्चेच्या शेवटी त्यांनी सभागृहातील सदस्यांना आवाहन करताना सांगितले की, हा विषय महिलांच्या सन्मानाशी संबंधित असून, अशा चर्चेत संवेदनशीलता आणि जबाबदारी जपणे आवश्यक आहे, महिलांच्या अधिकारात काम करणारी कार्यकर्ता म्हणून तुम्हाला विनंती आहे, असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा

'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' च्या गजरात आळंदीनगरी दमदुमली पुणे, दि....

शवविच्छेदन गृहांतील त्रुटींवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वेधले शासनाचे लक्ष

शवविच्छेदन केंद्रांमध्ये शीतगृहे, मनुष्यबळ आणि गोपनीयतेवर भर देण्याचे मुख्यमंत्री...

वारकऱ्यांच्या सेवेसाठी ५,००० चौ. फूट मुक्काम व्यवस्था, १९५ वॉटरप्रूफ मांडव, १०१ शाळा निवासासाठी खुल्या

'सेवा वारी' उपक्रमांतर्गत पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज पुणे, दि....

लोककलांना बळ; ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ अनुदान योजनेत

प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये;...