वारकऱ्यांच्या सेवेसाठी ५,००० चौ. फूट मुक्काम व्यवस्था, १९५ वॉटरप्रूफ मांडव, १०१ शाळा निवासासाठी खुल्या

Date:

‘सेवा वारी’ उपक्रमांतर्गत पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज

पुणे, दि. ८ जुलै : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवार, दि. ९ जुलै रोजी पुणे शहरात आगमन होत असून, वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी आणि सेवेसाठी पुणे महानगरपालिकेने यंदा ‘सेवा वारी’ हा विशेष उपक्रम राबविला आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने मुक्कामस्थळे, निवास, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि इतर सर्व सुविधा सज्ज केल्या आहेत.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पालखी नोडल अधिकारी निखिल मोरे आणि उपायुक्त माधव जगताप यांनी पालखीच्या अंतिम मुक्कामस्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मुक्कामस्थळी उपलब्ध जागा पाचपट वाढवून ५,००० चौरस फूट करण्यात आली आहे. महिला आणि पुरुष वारकऱ्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली असून, पालखी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच विशेष जर्मन हँगर उभारण्यात आला आहे. येथे फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांकडून वारकऱ्यांना मोफत फिजिओथेरपी आणि मालिश सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

वारकऱ्यांच्या सोयीसाठी शहरातील विविध ठिकाणी १९५ वॉटरप्रूफ मांडव उभारण्यात आले आहेत. तसेच मुक्काम आणि विश्रांतीसाठी पुणे महानगरपालिकेच्या १०१ शाळा खुल्या करण्यात आल्या असून, तेथे चोवीस तास मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि औषधांचा पुरवठा केला जाणार आहे.

वारीच्या काळात शहरातील पाणीपुरवठ्यात विशेष वाढ करण्यात आली असून, वारकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मार्गावरील आणि मुक्कामस्थळी मोठ्या संख्येने मोबाईल शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.

पुणे महानगरपालिका प्रशासनाने ‘सेवा हीच वारी, राम कृष्ण हरी’ या भावनेतून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मैदानात उतरविले असून, पुणेकर नागरिकांनीही माऊलींच्या सेवेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा

'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' च्या गजरात आळंदीनगरी दमदुमली पुणे, दि....

शवविच्छेदन गृहांतील त्रुटींवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वेधले शासनाचे लक्ष

शवविच्छेदन केंद्रांमध्ये शीतगृहे, मनुष्यबळ आणि गोपनीयतेवर भर देण्याचे मुख्यमंत्री...

लोककलांना बळ; ‘नमन खेळे’, ‘जाखडी’, ‘वहीगायन’ आणि ‘झाडीपट्टी’ अनुदान योजनेत

प्रत्येक लोककला प्रकारातील २० कलापथकांना प्रत्येकी ५० हजार रुपये;...