रुग्णालयांतील खाटा उपलब्धतेसाठी कोविड काळात सुरू केलेला ‘डॅशबोर्ड’ पुन्हा सुरू करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत मागणी

Date:

मुंबई.दि.७: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना दिलेल्या सवलतीच्या बदल्यात १५ टक्के खाटा राखीव ठेवण्याच्या अटींचे पालन होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी प्रश्न क्र. ९०५८ अंतर्गत, बृहन्मुंबई मधील ग्लोबल रुग्णालयाकडून या अटींचे पालन होत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सहभागी होत शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रुग्णांना खाटांची तत्काळ माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी कोविड काळात सुरू केलेला डिजिटल डॅशबोर्ड पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, कोविड काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या डॅशबोर्डमुळे कोणत्या रुग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती नागरिकांना आणि प्रशासनाला एका क्लिकवर मिळत होती. त्याच धर्तीवर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून नव्याने डॅशबोर्ड विकसित करावा. महानगरपालिका क्षेत्रासाठी स्वतंत्र आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र असे दोन डॅशबोर्ड कार्यान्वित केल्यास रुग्णांना तातडीने माहिती मिळेल, तसेच उपलब्ध खाटांचा पारदर्शक हिशोबही ठेवता येईल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सभागृहात नमूद केले.

या चर्चेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी, अशा प्रकारचा डॅशबोर्ड विकसित करण्याबाबत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या जातील, असे सकारात्मक आश्वासन सभागृहात दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...