संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त 10 ते 15 जुलै दरम्यान पुणे ग्रामीणमध्ये वाहतूक बदल : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Date:

पुणे, दि. 7 : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळा सन २०२६ हा १३ जुलै रोजी जेजुरी मुक्काम १४ जुलै रोजी वाल्हा मुक्काम व १५ जुलै रोजी निरा येथे विसाव्यासाठी थांवणार आहे. सदर पालखी पायीबारी सोहळ्यात अंदाजे ७ ते ८ लाख भाविक हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ पुणे ते पंढरपुर या मार्गाने पायी चालत असतात. तसेच सदर पालखी सोहळ्यामध्ये दिंड्याची वाहने मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे पालखी सोहळा कालावधीत वाहतुक कोंडी होवू नये व पालखी सोहळ्यास अडथळा निर्माण होवु नये याकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ मधील तरतूदीनुसार व शासन गृह विभागाचे दि.१९/०५/१९९० चे अधिसुचनेनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकाराने श्री संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा सन २०२६, चे अनुषंगाने वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणेबाबत खालील प्रमाणे वाहतुकीमध्ये बदल करुन पर्यायी मार्गाने वाहतुक वळविण्याचे आदेश दिले आहेत.

जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीणः बेलसर फाटा:- अ) १० जुलै रोजी रात्री २० ते १३ जुलै रोजी रात्री २० वा या वेळेत बारामती, फलटण, सातरा बाजुकडून येणारी पुणे वाजुकडे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन बेलसर फाटा- वाघापुर चौक उरुळी कांचन मार्गे पुणे बाजुकडे वळवावी. (ब) १३ जुलै रोजी सकाळी २० वाजता ते १४ जुलै २०२६ रात्री २० वा.पर्यंत सासवड पुणे, उरुळी मार्गे सातरा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करून ती बेलसर – कोथळे-नाझरे-काळा ओढा मार्गे मोरगाव कडे वळविण्यात येत आहे.

मोरगाव चौक जेजुरी: अ) ११जुलै रोजी सकाळी २० वा. ते १४ जुलै रोजीचे दुपारी १५ वा. पर्यंत वाहतुक नियमन करणे. (ब) १४ जुलै रोजी दुपारी १५ वा ते १५ जुलै रोजीचे रात्री ११ वा. सासवड, पुणे, उरुळी मार्गे सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्ण पुणे बंद करुन ती मोरगाव-लोणीभापकर कोऱ्हाळे मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे.

पारगाव मेमाणे चौक पारगावः अ) दि.११जुलै रोजी सकाळी २० ते १३ जुलै रोजीचे दुपारी १७ वा. पुण्याकडे जाणारी सर्व वाहतुक हि सासवड व जेजुरी बाजुकडे जावु न देता ती उरुळी मार्गे वळविण्यात येत आहे. (ब) १४ जुलै रोजी १५ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री ११ वा. सासवड, पुणे, उरुळी मार्ग सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती पिसर्वे-सुपा-लोणीभापकर कोऱ्हाळे मार्ग फलटण कडे वळविणेत येत आहे.

छत्रपती शिवाजी चौक निरा: दि.१० जुलै रोजी रात्री २० वा. १५ जुलै रोजी ११ वा. यावेळेत सातारा, फलटण, लोणंद येथुन पुणेकडे जाणेसाठी जेजुरी-सासवड वाजुकडे जाणारी सर्व वाहतुक पुर्ण पुणे बंद करणेत येत आहे व सदरची वाहतुक निरा मोरगाव-सुपा-कडेगाव चौफुला मार्गे पुणे बाजुकडे वळविणेत येत आहे

बेलसर गाव कोथळे चौक १० जुलै रोजी रात्री २० ते १४ जुलै रात्री ११ वा. या वेळेत जेजुरी मार्गे सातारा, फलटण, लोणंद बाजुकडे सर्व वाहतुक पुर्णपणे बेद करुन सदरची वाहतुक वेलसर कोथळे चौक-कोथळेगाव-नाझरे काळा ओढा गोगाय किंवा नाझरे- पांडेश्वर मार्गे सुपा मोरगाव अशी वळवावी.

जेऊर फाटा नवीन बायपास : १० जुलै रोजी रात्री ११या ते १५ जुलै रोजी रात्री ११ या वेळेत सातारा, फलटण, लोणंद येथुन पुणे बाजुकडे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती वाहतुक जेऊर फाटा- मांडकी-वीर- सारोळा मार्ग सातारा हायवे पुणे अशी वळविणेत येत आहे.

भोरवाडी फाटा जेजुरीः १४ रोजी दुपारी १५ वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री ११ वा. सासवड, पुणे, उरुळी मार्ग सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे जाणारी पालखी व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती कोळविहीरे मोरगाव रोड-मोरगाव- लोणीभापकर को-ळाळे मार्ग फलटण कडे वळविणेत येत आहे.

सुपा पोलीस स्टेशन, मोरगाव चौकः अ) १२ जुलै रोजी रात्री २० वा. ते १४ जुलै रोजीचे दुपारी १५ वा पर्यंत बारामती, निरा मार्गे पुणे कडे जाणारी वाहतुक सुपा- कडेगाव चौफुला मागे वळविण्यात येत आहे. (ब) १४ जुलै रोजीचे रात्री २० वा. ते १५ जुलै रोजीचे रात्री ११ वा. जेजुरी, चौफुला सुपा मार्गे सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथे व्यतिरिक्त सर्व वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती मोरगाव-लोणीभापकर-कोऱ्हाळे मार्गे फलटणकडे वळविणेत येत आहे.

सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण: अ) १३ जुलै रोजीचे सकाळो ०५ ते १५ जुलै रात्री ११ वा.पर्यंत पुणे बाजुकडुन जेजुरी मार्गे सातारा, फलटण बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड-नारायणपुर- कापूरहोळ मार्गे सातारा – फलटण किंवा सासवड-वरी फाटा परिंचे वीर-वाठार कॉलनी मार्गे लोणंद अशी वळविणेत येत आहे.
(ब) १३ जुलै सकाळी ०५ वा. ते १४ जुलै रोजी रात्री ११ वा. पर्यंत पुणे बाजुकडुन जेजुरी मार्गे बारामती बाजुकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन सासवड पारगाव मेमाणे पिसर्व-सुपा मार्गे बारामती अशी वळविणेत येत आहे.

लोणंद पोलीस स्टेशन जि सातराः १४ रोजी सकाळी ५ ते १५ जुलै रात्री ११ वा.पर्यंत लोणंद बाजुकडून निरा मार्ग व नवीन बायपास मार्गे पुणे कडे येणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन लोणंद-शिरवळ-कापूरहोळ-खेड शिवापुर मागे अशी वळविणेत येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

खडकवासला धरण ८८.५२ टक्के भरले; उजव्या कालव्यातून ५०० क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात

पावसाचा जोर आणि धरणातील येवा कायम राहिल्यास काही तासांत...

खासगी कोचिंग क्लासेसवर कायद्याचा अंकुश हवा; श्वेतपत्रिकेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

मुंबई.दि.७: राज्यातील खासगी ट्युशन क्लासेस आणि कोचिंग संस्थांकडून दिशाभूल...

रुग्णालयांतील खाटा उपलब्धतेसाठी कोविड काळात सुरू केलेला ‘डॅशबोर्ड’ पुन्हा सुरू करण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत मागणी

मुंबई.दि.७: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना दिलेल्या सवलतीच्या बदल्यात १५ टक्के...