भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

Date:

मुंबई-

भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील रिअर अॅडमिरल आलोक आनंद यांच्या नेतृत्वाखालील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी सिंगापूरमधील चांगी नौदल तळावरील आपली बंदर भेट यशस्वीरित्या पूर्ण केली. ही भेट भारतीय नौदलाच्या परिचालनात्मक तैनातीचा भाग होती.

आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष आणि भारत सरकारच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाशी सुसंगत असलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात दोन्ही देशांच्या नौदलांमधील समन्वय आणि कार्यसुसंगतता वाढविण्यासाठी विविध व्यावसायिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये परस्पर युद्धनौकांना भेटी देण्याचाही समावेश होता.

या बंदर भेटीदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनीही आयएनएस कवरत्तीला भेट दिली. त्यांना नौदलाच्या कार्यपद्धती, युद्धनौकेवरील जीवन आणि भारतीय नौदलाच्या सागरी मूल्यांची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाली.

ही भेट यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने भारत आणि सिंगापूर यांच्यातील वाढत्या सागरी भागीदारीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. या भेटीदरम्यान झालेल्या विविध उपक्रमांमुळे व्यावसायिक समज वाढण्यास, कार्यात्मक सहकार्य अधिक बळकट होण्यास तसेच प्रदेशातील शांतता, स्थैर्य आणि सुरक्षितता राखण्यासाठी दोन्ही देशांच्या सामायिक प्रयत्नांना चालना मिळाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रभू रामाच्या नावावर भक्तांच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्या भाजपा, आरएसएस विरोधात काँग्रेसचे उद्यापासून राज्यभर आंदोलन.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत उद्या ७ तारखेला नाशिकच्या काळाराम...

फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा: हर्षवर्धन सपकाळ.

७ हजार कोटी रुपयांच्या मिसिंग लिंकची दुर्दशा भ्रष्टाचारामुळे, देवेंद्र...

क्रांती दिनी होणार वंदेमातरमचा जागर

नागरिक सोशल फाउंडेशन...

अवघ्या ११ तासांत खडकवासला धरणसाखळीत १.३९ टीएमसी वाढ

सकाळी ६.९३ टीएमसी असलेला पाणीसाठा सायंकाळी ८.३२ टीएमसीवर; धरणसाखळी...