पावसामुळे कसबा पेठेत तालीमची भिंत कोसळली; राडारोडा हटविण्याचे काम युद्धपातळीवर

Date:

झांबरे वाडा परिसरात पुणे महापालिकेची तातडीची कारवाई; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू

पुणे, दि. ६ जुलै २०२६ : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कसबा पेठेतील झांबरे वाडा परिसरात तालीमची भिंत कोसळल्याची घटना घडली. प्रभाग क्रमांक २४ मधील घर क्रमांक ४३६ परिसरात ही घटना घडली असून, भिंतीचा मोठा राडारोडा अरुंद मार्गात पसरला.

घटनेची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. नागरिकांना होणारा धोका लक्षात घेऊन राडारोडा हटविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले.

कोसळलेल्या भिंतीमुळे परिसरातील ये-जा बाधित झाली होती. त्यामुळे मार्ग मोकळा करणे, धोकादायक भाग सुरक्षित करणे आणि परिसर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत आहेत.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जुन्या आणि कमकुवत बांधकामांजवळील नागरिकांनी सावध राहावे, तसेच धोकादायक भिंती किंवा बांधकामे आढळल्यास तातडीने महापालिका प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन

आळंदीत महापूर; पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय पुणे-आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने...

आज दुपारनंतर ताशी 70 ते 90 वेगाने वारे वाहणार, घराबाहेर पडणे टाळावे, CM देवेंद्र फडणीस यांचे आवाहन

मुंबई-मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज...

मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात पूर आणि दरडींचे संकट; पीएमआरडीएची विविध ठिकाणी बचावमोहीम

चाकणमध्ये पाण्यात अडकलेल्या २० ते २५ जणांची सुटका; मळवली,...