आज दुपारनंतर ताशी 70 ते 90 वेगाने वारे वाहणार, घराबाहेर पडणे टाळावे, CM देवेंद्र फडणीस यांचे आवाहन

Date:

मुंबईमुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेचे कामकाज तातडीने स्थगित करण्यात आले आहे. हवामानाच्या अत्यंत गंभीर आणि रौद्र परिस्थितीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुंबईतील विविध दुर्घटनांवरून विरोधक आक्रमक झाले होते. विरोधकांच्या भूमिकेवर बोलताना राजकीय आकडेवारीपेक्षा संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचे उद्या पूर्ण निवेदन देणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

याचबरोबर “आज दुपारनंतर वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार असून ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,” असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केले आहे.

मुंबईत दोन दिवसांत १२ बळी; विरोधक आक्रमक

सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील गंभीर पूरपरिस्थिती आणि अपघातांवरून सरकारला घेरले. “मुंबईत मॅनहोलमध्ये पडून, झाडे कोसळून तसेच मानखुर्द येथील इमारत कोसळून गेल्या दोन दिवसांत १२ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले. सरकारने या संपूर्ण परिस्थितीवर तातडीने अधिकृत निवेदन द्यावे, तसेच या सर्व दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
मुंबईत दरवर्षी ८०० झाडे पडतात, काल एकाच दिवसात ३५० पडली

विरोधकांच्या मागण्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट केले. ते म्हणाले, “सध्या निसर्गाच्या माध्यमातून अत्यंत अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल ताशी ५० किमी वेगाने वारे वाहत होते. मुंबईत संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ८०० झाडे पडतात, पण काल एकाच दिवसात ३५० झाडे कोसळली. आजचा दिवस त्याहूनही गंभीर आहे. दुपारनंतर वाऱ्याचा वेग ७० ते ९० किलोमीटर प्रतितास होणार असल्याने आम्ही सर्वांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची विनंती केली आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पावसामुळे कसबा पेठेत तालीमची भिंत कोसळली; राडारोडा हटविण्याचे काम युद्धपातळीवर

झांबरे वाडा परिसरात पुणे महापालिकेची तातडीची कारवाई; नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी...

आळंदीत येऊ नका, वारकऱ्यांना प्रशासनाचे तातडीचे आवाहन

आळंदीत महापूर; पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय पुणे-आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने...

मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात पूर आणि दरडींचे संकट; पीएमआरडीएची विविध ठिकाणी बचावमोहीम

चाकणमध्ये पाण्यात अडकलेल्या २० ते २५ जणांची सुटका; मळवली,...