पुणेकरांनो घराबाहेर निघताना जपून, शहरात पावसाची जोरदार हजेरी;हवामान विभागाचं इशाऱ्यासह मोठं आवाहन

Date:


पुणे : पुणे शहर, जिल्ह्यासह घाट माथ्यावर शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले होते त्यामुळे पुणेकरांना सूर्यदर्शन झालेच नाही. दिवसभर अधूनमधून विश्रांती घेऊन पावसाच्या मध्यम ते जोरदार सरी पडल्या.
धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम राहिल्याने पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक वातावरण मिळाले आहे. त्यामुळे सध्या पुण्यासह राज्यात सर्वदूर पाऊस बरसतो आहे. शनिवारदेखील पुण्यासाठी पावसाचा दिवस ठरला. शुक्रवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस शनिवारी दिवसभर सुरू होता. सकाळी दहाच्या सुमारास आणि दुपारी एकच्या दरम्यान मोठी सर पडली. हवेत गारवाही वाढला होता. पावसामुळे संपूर्ण शहरात वाहतूक संथ झाली होती. काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या. संध्याकाळी पाचनंतर जोर ओसरला; पण ढगाळ वातावरण कायम होते. शहरात सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत १४.५ मिलिमीटर पाऊस पडला. जुलैच्या पहिल्या दिवसापासून सलग चार दिवस सरी बरसल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेले पुणेकर खूश झालेच शिवाय शेतीची कामे मार्गी लागल्याने शेतकरीही सुखावला.
शहर आणि जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. शहरात रविवारी दिवसभर आकाश मुख्यतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार आणि अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे घाट माथ्यासाठी रेड ॲलर्ट देण्यात आला आहे. वर्षासहलीसाठी जाणाऱ्यांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
रेड अलर्ट जारी

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शनिवारी जनजीवन विस्कळीत झाले. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिकसह विदर्भातही अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि पुणे-सातारा घाटमाथा परिसरासाठी रविवारी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
ताम्हिणीत २४ तासांत २०० मिमी

घाटमाथ्यावर शनिवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडला. भिरा येथे २४ तासांत २४३, ताम्हिणीमध्ये २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोणावळा येथे १६५ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कात्रजमध्ये सोसायटीची सीमाभिंत कोसळली; १८ वाहनांचे मोठे नुकसान

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे:शहरात सुरू असलेल्या...

🟥 भीमा खोऱ्यात मान्सूनची सलग फलंदाजी; प्रमुख धरणांतील पाणीसाठा वाढू लागला

🟨 मुळशी, भाटघर, पवना, नीरा देवघरसह अनेक धरणांना मान्सूनचा...