खडकवासला मतदारसंघात विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षणाला वेग; राजकीय पक्षांनी तातडीने BLA नियुक्त करावेत : डॉ. यशवंत माने

Date:

पुणे, दि. ५ जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर २११ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा हवेली उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना महत्त्वपूर्ण सूचना जारी केल्या आहेत. या अभियानात मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने तातडीने बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्त करून त्यांची यादी कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डॉ. यशवंत माने यांनी काढलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रासह १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरू असून, निर्धारित वेळापत्रकानुसार विविध टप्प्यांतील कामे सुरू आहेत.
या कार्यक्रमानुसार २० ते २९ जून २०२६ दरम्यान गणना अर्जांची छपाई व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत BLO प्रत्यक्ष घरोघरी जाऊन Enumeration Form वाटप, अर्ज भरून घेणे व संकलन करण्याचे काम करीत आहेत. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध करण्यात येणार असून, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व आक्षेप स्वीकारले जातील. ३ ऑक्टोबरपर्यंत त्यांची सुनावणी व निर्णय प्रक्रिया पूर्ण करून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
डॉ. माने यांनी स्पष्ट केले की, २११ खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना BLO मार्फत गणना अर्ज वितरित केले जात आहेत. मतदारांनी अर्ज अचूक भरून संबंधित BLO कडे जमा करावेत. यावेळी मतदार यादीतील पत्त्यावर न आढळणारे, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले, दुबार नोंद असलेले अथवा मृत मतदार यांची स्वतंत्र ASD (Absent, Shifted, Dead) यादी तयार केली जाणार आहे. आवश्यक सुनावणीनंतर अशा मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विशेष पुनरिक्षण प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर BLA नियुक्त करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद करून अनेक राजकीय पक्षांनी अद्याप त्यांच्या BLA ची यादी सादर केलेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ स्तरावरील अध्यक्षांमार्फत BLA यांची नावे तातडीने 211khadakwaslaac@gmail.com या ई-मेलवर पाठवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणही या अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी प्रत्येक मतदान केंद्रातील सेक्शनची पुनर्रचना करून त्यात संबंधित सोसायट्या, गृहसंकुले, वसाहती आणि ओळखण्याजोग्या खुणांचा समावेश करण्यात यावा. त्यासंदर्भातील सूचना व प्रस्ताव १० जुलै २०२६ पूर्वी जिल्हाधिकारी, पुणे यांच्याकडे सादर करण्यासाठी या कार्यालयाला पाठवावेत, असेही परिपत्रकात नमूद आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण ५०५ मतदान केंद्रांचे यादी भाग असून त्यासंबंधित माहिती तसेच Unmapped मतदारांचा डेटा झिप फाईलच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित मतदारांना आवश्यक नातेसंबंधाचे पुरावे सादर करण्यासाठी BLA मार्फत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मतदारांनी BLO च्या गृहभेटीदरम्यान आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, तसेच voters.eci.gov.in किंवा ECINet App वर आपला किंवा पालकांचा जुना मतदार तपशील तपासून ठेवावा. जन्म दाखला, दहावीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, सरकारी ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, जमीन अथवा घर वाटप प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक, टपाल, जीवन विमा महामंडळ अथवा शासनाने १ जुलै १९८७ पूर्वी दिलेली ओळखपत्रे यासह आधार कार्ड देखील आवश्यक पुरावा म्हणून स्वीकारले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या अभियानासंदर्भातील SIR कार्यक्रम, मतदान केंद्रनिहाय BLO यादी, सादरीकरण (PPT), ASD यादी, राजकीय पक्षांना दिलेली पत्रे, BAG (Booth Level Awareness Group) मार्गदर्शक सूचना, BLO-BLA कामकाजाच्या सूचना तसेच Unmapped मतदारांची माहिती QR कोडद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदार नोंदणी अधिकारी तथा हवेली उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी सर्व राजकीय पक्ष, त्यांच्या पदाधिकारी, BLA तसेच मतदारांनी या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन पात्र मतदारांचे नाव मतदार यादीत कायम राहील आणि मतदार यादी अधिक अचूक व विश्वासार्ह बनेल यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभर पावसाचा कहर; वसईत रस्त्याला नदीचे रूप, २० कार पाण्याखाली

गुजरातमध्ये कॉलनीत चालली बोट; १३ राज्यांना मुसळधार पाऊस आणि...

भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

पुणे | प्रतिनिधी पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र...

पावसाळी गटारे म्हणजे शहराची जीवनवाहिनी… ती बंद झाली की रस्तेच बनतात तलाव!

ऑपरेशन पावसाळी गटारे – भाग २ ड्रेनेज वेगळे... पावसाळी गटारे...