भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याला पुण्यात नवी गती; पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक आयटी रोजगारांची संधी

Date:

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहर भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्याचे महत्त्वपूर्ण केंद्र बनण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. जपानमधील आयएम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष रेन्या किकुची आणि वरिष्ठ सल्लागार ताकाशी इतामिया यांनी फिडेल सॉफ्टटेकचे संस्थापक-अध्यक्ष सुनील कुलकर्णीव्यवस्थापकीय संचालक प्राची कुलकर्णी यांच्यासमवेत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी या बैठकीत समन्वयक व प्रेरक म्हणून मार्गदर्शन केले.

बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल अभियांत्रिकी, संशोधन-विकास, नवसंकल्पना, तंत्रज्ञानाधारित गुंतवणूक आणि उच्च-कौशल्याधारित रोजगारनिर्मिती यांसह भारत–जपान तंत्रज्ञान सहकार्य अधिक दृढ करण्यावर सविस्तर चर्चा झाली.

यानंतर शिष्टमंडळाने महापौर मंजूषा नागपुरे यांची सदिच्छा भेट घेतली. शहर विकास, तंत्रज्ञान सहकार्य, कौशल्यविकास, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी फिडेल सॉफ्टटेक जपानने भारतातील विस्तारासाठी पुणे शहराची निवड केल्याची माहिती देण्यात आली. प्रस्तावित विस्तार प्रकल्पांतर्गत पुढील पाच वर्षांत १,००० हून अधिक उच्च-कौशल्याधारित माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगार उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, सॉफ्टवेअर विकास, डिजिटल अभियांत्रिकी आणि संशोधन-विकास क्षेत्रांना चालना मिळणार असून, विशेषतः जपानी भाषा अवगत असलेल्या तरुणांसाठी जागतिक दर्जाच्या करिअरच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

भारत–जपान औद्योगिक आणि तंत्रज्ञान सहकार्य अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, पुणे शहराला जागतिक तंत्रज्ञान नकाशावर अधिक सक्षम स्थान मिळण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे जिल्ह्यात प्रारूप मतदार यादीत ६२.१३ लाख मतदार; २८.६६ लाख मतदार ‘अनकलेक्टेबल’

२१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप यादी प्रसिद्ध; १३.३२ लाख प्रकरणांवर...

गणेशोत्सवासाठी पुणे जिल्ह्यात २७ विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त

पुणे, दि .३१ : आगामी गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये मनाई आदेश

पुणे, दि. ३१ : आगामी गणेशोत्सव व विविध धार्मिक...

डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट वाहतूक विभाग अंतर्गत नो पार्किंग झोन जाहीर

पुणे, दि.३१: डेक्कन, सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट, विश्रामबाग, चंदननगर,...