शेअर मार्केटमध्ये भरघोस परताव्याचे आमिष; कोथरूडमधील व्यक्तीची ₹१३.३१ लाखांची ऑनलाइन फसवणूक

Date:

फुरसुंगीत कपड्यांच्या दुकानातून ₹४.५० लाखांची रोकड चोरी; आंबेगाव, कोथरूडमध्येही गुन्हे दाखल

पुणे | प्रतिनिधी

पुणे शहरात ऑनलाइन फसवणूक, चोरी आणि मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, कोथरूड परिसरातील एका ३४ वर्षीय व्यक्तीची शेअर मार्केटमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल ₹१३ लाख ३१ हजार १०८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक, टेलिग्राम अकाउंटधारक आणि लिंक वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या भावाच्या मोबाईलवर टेलिग्राम पाहत असताना आरोपींनी लिंक पाठवून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. विश्वास संपादन केल्यानंतर विविध व्यवहारांच्या माध्यमातून त्यांच्याकडून ₹१३.३१ लाख उकळण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, फुरसुंगी परिसरात कपड्यांच्या दुकानात घरफोडी करून चोरट्यांनी कॅश काऊंटर आणि ड्रॉवरमधील ₹४ लाख ५० हजारांची रोकड लंपास केली. दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी खिडकीचे गज उचकून आरोपींनी दुकानात प्रवेश करून चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगाव परिसरात आणखी एका व्यक्तीची एपीके (APK) फाईल पाठवून मोबाईल हॅक करण्यात आला. मोबाईलचा ताबा मिळवल्यानंतर आरोपींनी संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून ₹२ लाख ६२ हजार ४९९ रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याशिवाय, कोथरूडमधील जयभवानीनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषांना बळी न पडण्याचे, कोणतीही APK फाईल किंवा संशयास्पद लिंक डाउनलोड न करण्याचे तसेच अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भूतानने नाकारले भारताचे इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोल

नवी दिल्ली / थिंपू | प्रतिनिधी भारत सरकारने इथेनॉल मिश्रित...

मिसिंग लिंकवर पहिल्याच पावसात खड्डे; कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

दोन महिन्यांतच उखडला रस्ता; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, एमएसआरडीसीचे...