विना लेबल तूप व नमकीनचा ३९० किलो साठा जप्त; पुण्यातील आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित

Date:

पुणे, दि. ३: अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ‘सेफ फुड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन पुणे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत मे. देवांश मिल्क अॅन्ड मिल्क प्रॉडक्टस, स नं. २१/१/३, शिव पार्वती अंगण, भालेकर नगर, पिंपळे गुरव, पुणे या आस्थापनेची तपासणीवेळी २३० कि.ग्रॅ. रुपये ९० हजार ५०० किंमतीचा साठा विना लेबल व भेसळीच्या संशयावरुन जप्त करण्यात आला. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींची गंभीर दखल घेत ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने संबंधित आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती. शि. ग. घाटोळ यांनी श्री. सा. सु. पटवर्धन, श्री. अक्षय शेळके यांच्या पथकाने श्री. विश्वजीत शिंदे, सहायक आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

पुणे विभागातील सोलापुर कार्यलयाकडून मे. संगीता फूड प्रॉडक्टस, मड्डे वस्ती, सोलापुर या आस्थापनेची सखोल तपासणी करुन नमकीन या अन्न पदार्थाचा १६० कि.ग्रॅ, किंमत रु. ३२ हजार किंमतीचा साठा लेबलमधील त्रुटी व भेसळीच्या संशयावरुन जप्त करण्यात आला. ही कारवाई साहेबराव देसाई, सहायक आयुक्त् (अन) यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती. कि. घ. देशमुख यांनी केली.

“विनापरवाना अथवा नियमबाह्य पद्धतीने अन्न व्यवसाय करणाऱ्या तसेच दर्जाहीन, भेसळयुक्त अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया व विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनामार्फत यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती सह आयुक्त (अन्न्) दि.वा.भोगावडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

FDA अधिकारी स्वतःला देव समजतात का? मुंबई हायकोर्टाचे कार्यपद्धतीवर कडक ताशेरे

‘स्वतःचे नियम वाचत नाहीत, कायद्याची माहिती नसताना थेट कारवाई’;...

एव्हरेस्ट आणि LGच्या मिश्रित हिंगाच्या विक्रीवर FSSAIची मनाई

तपासणीत गुणवत्ता निकषांचा भंग; आवश्यक ५ टक्क्यांच्या तुलनेत अल्कोहोलमध्ये...