मुंबई-विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होते.
सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आदित्य ठाकरे यांना सर्वांत मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात विधान परिषदेचे दोन आमदार होते. वरळी विधानसभा मतदासंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे.
कोण आहेत सचिन अहिर?
सचिन अहिर यांचे नेतृत्व कामगार चळवळीतून घडले. त्यांनी सामाजिक क्षेत्रातून राजकारणात प्रवेश केला. पहिल्यांदा 1999 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढले. शिवडी मतरासंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004, 2009 मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले. महाविकास आघाडी सरकारमध्ये 2009 मध्ये त्यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री पद भूषविले. मात्र, 2019 च्या ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या विजयात त्यांचा वाटा मोलाचा ठरला. शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीनंतर ते उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. मात्र, आता ऐन विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत उडी घेत थेट विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरे सोडून सर्व आमदार आमच्यासोबत येतील असे शिरसाट यांनी म्हटले आहे. ऑपरेशन टायगर 3.0 नाही. आता केवळ सचिन अहिर यांचा प्रवेश झाला आहे. ऑपरेशन पुढे होणार आहे.
शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे हे आहेत विधान परिषदेचे आमदार
सुनील शिंदे
जगन्नाथ अभ्यंकर
अनिल परब
अंबादास दानवे
मिलींद नार्वेकर
विधानसभा आमदारांची यादी
1गुहागर – भास्कर जाधव
2बार्शी – दिलीप सोपल
3 धाराशिव – कैलास पाटील
4उमरगा – प्रवीण स्वामी
5खेड आळंदी – बाबाजी काळे
6 भायखळा – मनोज जामसूतकर
7 शिवडी – अजय चौधरी
8वरळी – आदित्य ठाकरे
9माहीम – महेश सावंत
10 वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
11 मेहकर- सिद्धार्थ खरात
12 दर्यापूर – गजानन लवाटे
13 बाळापूर – नितीन देशमुख
14 वणी – संजय देरकर
15परभणी – राहुल पाटील
16विक्रोळी – सुनील राऊत
17जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर
18दिंडोशी – सुनील प्रभू
19वर्सोवा – हरुन खान
20कलिना – संजय पोतनीस
असे दोन्ही सभागृहात मिळून शिवसेनेचे 25 आमदार आता ठाकरेंसोबत आहेत.

