महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष व चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त पुणे महापालिकेत वर्षभर विविध कार्यक्रम; पक्षनेते सभेची मान्यता

Date:

पुणे, दि. २९ जून २०२६ : पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर मा. परशुराम वाडेकर यांच्या विशेष प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त तसेच चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रस्तावाला आज झालेल्या पक्षनेते सभेत मान्यता देण्यात आली.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दि. ०५ मे २०२६ रोजी पत्र क्र. १८१० द्वारे पुणे महानगरपालिकेत या ऐतिहासिक वर्षानिमित्त भव्य आणि नियोजनबद्ध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीस आज पक्षनेते सभेने मंजुरी दिली.
यावर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांचे द्विशताब्दी वर्ष देशभर आणि राज्यभर मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहे. तसेच पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणून त्यांच्या कार्याला १५० वर्षे पूर्ण होत असून, सामाजिक समतेच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण चवदार तळे सत्याग्रहालाही १०० वर्षे पूर्ण होत आहेत. महात्मा फुले यांची कर्मभूमी असलेल्या पुण्यात या ऐतिहासिक घटनांचे स्मरण भव्य स्वरूपात व्हावे, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने या उपक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली होती. तसेच एप्रिल २०२६ मध्ये झालेल्या मुख्यसभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची आग्रही मागणी केली होती. त्यावेळी सभापती म्हणून मा. उपमहापौर यांनी प्रशासनाला यासाठी समिती स्थापन करून नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.
मान्य झालेल्या प्रस्तावानुसार पुणे महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, गटनेते आणि सभासद(नगरसेवक) सदस्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती संपूर्ण वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन, समन्वय आणि प्रभावी अंमलबजावणी करेल. समितीवरील दोन सदस्यांची नियुक्ती पक्षनेते सभेमार्फत करण्यात येणार असून, वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजन व अंमलबजावणीचे अधिकार महापौर यांना प्रदान करण्यात आले आहेत.
या उपक्रमांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांमध्ये वक्तृत्व, निबंध, चित्रकला व इतर स्पर्धा, विचारप्रबोधनपर व्याख्याने, मिरवणुका, प्रदर्शन, सामाजिक जनजागृती अभियान तसेच महात्मा फुले यांच्या समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा व्यापक प्रसार करणारे विविध उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभावी प्रचार-प्रसार होऊन नव्या पिढीपर्यंत त्यांचा सामाजिक परिवर्तनाचा वारसा अधिक व्यापकपणे पोहोचेल, असा विश्वास उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एमपीएससीच्या कारभारात पारदर्शकता, भरतीला गती आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी विधानपरिषदेत डॉ. नीलम गोऱ्हेंची यांची जोरदार मागणी

एमपीएससीने विद्यार्थ्यांशी थेट संवादाबरोबरच वेळबद्ध भरती, पारदर्शक परीक्षा प्रक्रिया...

गृहसंस्थांच्या पातळीवर सहकाराची तत्वे रूजवणे आवश्यक–विद्याधर अनास्कर

पुणे, दि.२९: सहकाराचे अनेक पैलू आहेत. सहकारी गृहसंस्था आणि...

अल्पवयीन मुलाने ५५ वर्षीय दुचाकीस्वाराला लुटले; सेव्हन लव्हज चौक :रात्री साडेदहा वाजता …

पुणे | प्रतिनिधी खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ५५ वर्षीय...