कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत : डॉ. स्वाती महाळंक

Date:

करम प्रतिष्ठान आयोजित करमरजनीगंधा उपक्रमास प्रतिसाद

पुणे : कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत असते. कविता लिहायची असेल तर त्यासाठी मनाची मशागत करावी लागते. इतरांनी काय लिहिले आहे याचेही वाचन केले पाहिजे. मनन, चिंतनातून तुम्ही घडत जाता. कविता वाचन हे एकप्रकारचे सादरीकरण असते. त्यामुळे कविता सादर करताना कुठल्या शब्दानंतर थांबावे, कोणत्या शब्दावर जोर द्यावा हे कळले तरच कवितेचे सादरीकरण उत्तम होते आणि कविता नेमकेपणाने रसिकांपर्यंत पोचते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ.  स्वाती महाळंक यांनी केले.

करम प्रतिष्ठानतर्फे आयोजित करम रजनीगंधा या कार्यक्रमाचे रविवारी सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. महाळंक बोलत होत्या. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भूषण कटककर, ज्येष्ठ सल्लागार प्रज्ञा महाजन उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या सदस्या स्वाती सामक, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. मीना शिंदे यांनी प्रथम सत्राचे सूत्रसंचालन केले.

द्वितीय सत्राची सूत्रे तरूजा भोसले व शीला टाकळकर यांनी सांभाळली. रेखा येळंबकर, वैजयंती आपटे व अनुराधा काळे यांचा विशेष सहभाग होता. काव्यसंमेलनात वासंती वैद्य, धनंजय तडवळकर, शैलजा किंकर, रेखा कुलकर्णी, प्रतिभा विभुते, दाक्षायणी पंडित, सुनीता टिल्लू, मीनाक्षी नवले, रेखा देशमुख, भालचंद्र कुलकर्णी, अंजली देसाई, स्मिता जोशी, सुजाता पवार, माधुरी दीक्षित यांनी कवितांचे सादरीकरण केले. नियोजन निरूपमा महाजन, प्राजक्ता वेदपाठक, मुक्ता भुजबले यांनी केले.

प्रास्ताविकात भूषण कटककर म्हणाले, कवितेसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये कविता सादरीकरणाला बंधन नसते. सध्या एआयची चलती आहे. त्याचा धोका कवितेलाही होईल, अशी भीती आहे. पण कविता करण्यासाठीची गुणवत्ता एआयकडे नाही. त्यामुळे कवींनी समाजाचे चित्रण अधिक वास्तववादी करावे.’’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांचा सन्मान लोकशाही समाजवादाचा आवाज बुलंद करणारा : डॉ. श्रीपाल सबनीस

मनोहारी मैत्र संघातर्फे डॉ. शमसुद्दिन तांबोळी यांना भाई वैद्य स्मृती पुरस्कार...

“एका विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी देणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करणे होय.” – विकास पासलकर.

राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात संपन्न पुणे-समाजसेवकांचा गौरव,...

भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १,५०० विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप

पुणे-श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने क्रांतीसूर्य भाऊसाहेब रंगारी...

एका कॉलवर कोथरूडमधील पेन्शनराची आयुष्यभराची पुंजी लुटली; १.१० कोटींची फसवणूक

पुणे: शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत गब्बर होण्याचे आमिष...