“एका विद्यार्थ्याला शिक्षणाची संधी देणे म्हणजे संपूर्ण समाजाच्या भविष्यामध्ये गुंतवणूक करणे होय.” – विकास पासलकर.

Date:

राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सव सोहळा २०२६ उत्साहात संपन्न

पुणे-समाजसेवकांचा गौरव, गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि शाहू विचारांचा जागर. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित १२ वा राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सव सोहळा – २०२६ आज पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या सामाजिक न्याय, शिक्षण, समता, बंधुता आणि लोककल्याण या विचारांचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यास
मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष .राजेंद्र दुबल, सचिव मारुतीराव सातपुते, फाउंडेशनचे मार्गदर्शक विकास पासलकर, जेष्ठ विधीज्ञ ॲड.मिलिंद पवार, सुभाष सातपुते, अजित महाडिक, प्रशांत जगताप, बाळासाहेब बोडके, यशांवराव भुजबळ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि शाहूप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना “राजर्षी शाहू महाराज सामाजिक पुरस्कार – २०२६” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यात प्रामुख्याने महाराष्ट्र विद्यार्थी संघटना, किशोर कांबळे, योगेश शिरोळे, अनिल गिड्डे, ह.भ.प. रामदास महाराज चऱ्हाटे, संजय मोरे, सौ. अस्मिता रानभरे, सागर खळदकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ग्रामीण, आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व प्रोत्साहन देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक समता, स्त्री-सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगत युवकांनी समाजपरिवर्तनासाठी पुढे यावे, असे आवाहन विकास पासलकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विराज तावरे व डॉ.स्वप्नील चौधरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्रशांत धुमाळ, नानासाहेब कदम युवराज ढवळे, रोहित जाधव, निलेश इंगवले सचिन जोशी, अक्षय रनपिसे मंदार बहिरट तसेच सर्व पदाधिकारी, समन्वय समिती सदस्य, देणगीदार, पत्रकार बंधू-भगिनी आणि उपस्थित सर्व शाहूप्रेमी नागरिकांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन हे गेल्या बारा वर्षांपासून “एक पाऊल कृतीशीलतेकडे…” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन शिक्षण, सामाजिक प्रबोधन, गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थांचा गौरव, पर्यावरण संवर्धन आणि समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कविता ही आयुष्यभर जपण्याचे व्रत : डॉ. स्वाती महाळंक

करम प्रतिष्ठान आयोजित करमरजनीगंधा उपक्रमास प्रतिसाद पुणे : कविता ही आयुष्यभर जपण्याचे...

भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १,५०० विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप

पुणे-श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने क्रांतीसूर्य भाऊसाहेब रंगारी...

एका कॉलवर कोथरूडमधील पेन्शनराची आयुष्यभराची पुंजी लुटली; १.१० कोटींची फसवणूक

पुणे: शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत गब्बर होण्याचे आमिष...