ठाण्यात ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त:3 कोटींचा चरससह ट्रामाडॉल जप्त

Date:

ठाणे-ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. गुजरातच्या एका अट्टल तस्करासह थेट जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि कुपवाडा येथून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत ३ कोटी ३ लाख ५४ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात ३ किलो २० ग्रॅम चरस आणि तब्बल १२,९८४ ट्रामाडॉल कॅप्सुल्सचा समावेश आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाचे पोहवा अमोल देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मे रोजी रात्री ११.५० च्या सुमारास खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला. तेथून मुंब्रा बाजूकडे जाणाऱ्या फिरोज अब्दुल खान (५२, रा. अंकलेश्वर, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ कोटी रुपयांचे चरस आणि ४ लाख ४८ हजार ५१४ रुपयांच्या प्रतिबंधित ‘स्पॅस्मो-प्रॉक्सिव्हॉन आर-प्लस’ (ट्रामाडॉल) कॅप्सुल्स मिळून आल्या. मोहम्मद अशरफ गुलाम अहमद शेदा, शौकत मीरला यांना काश्मीरमधून अटक केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मोदी म्हणाले– पेपरफुटी रोखण्यासाठी उद्या कठोर कायदा आणणार

पंतप्रधान मोदींनी रविवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सोशल मिडिया...

‘टोलकरी’ गडकरी यांचाही राजीनामा घ्या:इथेनॉलमिश्रित इंधनाने वाहनांची वाट लावली – हर्षवर्धन सपकाळ

‘महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री अमित शहा’ असल्याचीही टीका,वाहनधारकांची पंतप्रधानांनी...

भारताची फाळणी ही इतिहासातील सर्वात मोठी चूक ; POK परत मिळवणे हाच एकमेव प्रलंबित विषय: डॉ. जितेंद्र सिंह

मुंबई-केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)...

लोकायन 26 – भारतीय नौदलाचे जहाज सुदर्शनीचे अमेरिकेतील बोस्टनहून प्रस्थान.

मुंबई -भारतीय नौदलातील प्रशिक्षण जहाज आयएनएस सुदर्शनी, ने लोकायन...