फर्ग्युसनच्या वसतिगृहातील सावरकरांच्या स्मृतींना अभिवादन

Date:

जयंतीनिमित्त ऐतिहासिक खोली दर्शनासाठी खुली-दिवसभर सावरकरप्रेमींची गर्दी

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. २८ मे) डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहातील खोली क्रमांक १७ येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे या खोलीमध्ये वास्तव्य होते.

सकाळी ९ वाजता डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे यांच्या हस्ते स्वा. सावरकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 ही खोली इतिहासप्रेमी आणि सावरकर अनुयायांसाठी प्रेरणास्थान मानली जाते. जयंतीनिमित्त ही खोली सर्वांसाठी दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली होती. दिवसभर सावरकरप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी येथे भेट देत इतिहासाच्या साक्षीदार ठरलेल्या वस्तूंचे दर्शन घेतले.

या खोलीमध्ये स्वा. सावरकर यांनी वापरलेल्या काळातील अभ्यासाचे टेबल, लाकडी खुर्ची, पारंपरिक पलंग, पुस्तके ठेवण्याची कपाटे, जुन्या शैलीतील लेखन साहित्य, छायाचित्रे आणि त्यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे दस्तऐवज जतन करून ठेवण्यात आले आहेत. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिलेली आरती ही भिंतीवर रेखाटण्यात आली आहे.

विद्यार्थीदशेत सावरकरांनी येथेच राष्ट्रभक्तीचे विचार मांडले, कविता आणि लेखन केले तसेच सहकाऱ्यांमध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा जागवली, अशी ऐतिहासिक नोंद आहे.

कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शाम मुडे , उपप्राचार्य प्रा. स्वाती जोगळेकर, डॉ. शरद कुंटे, मिलिंद कांबळे, डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, अंकित रावळ, श्रद्धा काने टकर, गायत्री दीडमिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी...

जावयांना सासरकडील नातेवाईकांकडून मारहाण:पुणे शहरातील दोन घटना, एकाचे नाक फ्रॅक्चर

पुणे -शहरात सासरकडील नातेवाईकांकडून जावयांना मारहाण करण्याच्या दोन स्वतंत्र...

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन

पुणे-माजी आमदार रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३...

 ‘संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘आषाढी पंढरपूर सायकल वारीत 4000 हून अधिक सायकलस्वार सहभागी

मुंबई, 13 जुलै 2026 फिट इंडियाच्या 81 व्या पर्वातील वैशिष्ट्यपूर्ण...